मेष राशि (Aries)
आरोग्य चांगले राहील, पण डोकेदुखी किंवा जुनी दुखापत त्रास देऊ शकते. व्यावसायिक दृष्टिकोनातून काळ खूप उज्ज्वल असून नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी उत्तम योग आहेत. सिंगल असणाऱ्यांच्या आयुष्यात नवीन प्रेम येऊ शकते आणि विवाहित लोकांना जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. आज सूर्याला जल अर्पण करणे शुभ ठरेल.
वृषभ राशि (Taurus)
आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत धनधायक म्हणजेच फायदाच फायदा करून देणारा आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम काळ असून सरकारी क्षेत्रातून मोठा लाभ होईल. विवाहित लोकांचे जीवन आनंदाचे राहील, मात्र लव्ह लाईफमध्ये इतर पर्यायांच्या नादात जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. आज लाल वस्तूचे दान करावे.
मिथुन राशि (Gemini)
सरकारी कामात किंवा अधिकाऱ्यांशी वाद घालणे पूर्णपणे टाळा आणि वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. व्यवसायात थोडे चढ-उतार पाहायला मिळतील, पण गुंतवणुकीसाठी हा अतिशय योग्य आणि सुरक्षित काळ आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीत आजचा दिवस अतिशय गोड असून सिंगल लोकांचे नाते आता फायनल होण्याच्या मार्गावर असेल.
कर्क राशि (Cancer)
आरोग्य ठीक राहील, पण आज भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. व्यवसायात सध्या जी परिस्थिती आहे तीच कायम ठेवा, कारण नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अजिबात योग्य नाही. वैयक्तिक आयुष्यात प्रेमाच्या बाबतीत अति-हट्टीपणा नडेल, त्यामुळे नात्यात तात्पुरता दुरावा येऊ शकतो. आज शनिदेवाचे स्मरण करावे.
सिंह राशि (Leo)
आरोग्य अतिशय उत्तम राहील आणि सरकारी क्षेत्राशी जोडलेल्या कामांमधून भरपूर आर्थिक फायदा होईल. आर्थिक बाजू मजबूत असल्यामुळे गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत फलदायी आणि फायदेशीर ठरेल. लव्ह लाईफमध्ये नवीन उत्साह जाणवेल आणि सिंगल लोकांच्या आयुष्यात नवीन प्रेमाचे आगमन होऊ शकते. आज लाल रंगाची वस्तू स्वतःजवळ ठेवावी.
कन्या राशि (Virgo)
व्यापार आणि कामाच्या दृष्टीने हा अतिशय शुभ आणि प्रगतीचा काळ आहे, पण गुंतवणुकीच्या बाबतीत घाई न करता सावध राहावे. जोडीदारासोबत ताळमेळ चांगला बसेल आणि एकमेकांबद्दलची समजूतदारपणा वाढेल. सिंगल लोकांसाठी नवीन नात्यात पडण्यासाठी हा काळ फारसा अनुकूल नाही. आज गणपती बाप्पाला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करावी.
आजच्या दिवशी आर्थिक बाबतीत गुंतवणूक करणे पूर्णपणे टाळा, अन्यथा मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. बोलण्यावर आणि जिभेवर ताबा ठेवा, नाहीतर घरातील किंवा बाहेरील महत्त्वाचे नातेसंबंध बिघडतील. वडिलांच्या आरोग्याची चिंता सतावेळ आणि सरकारी कामात वाद टाळणेच हिताचे राहील. आज शनिदेवाचे दर्शन घ्यावे.
वृश्चिक राशि (Scorpio)
आज तुमच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळेच आकर्षण पाहायला मिळेल, ज्यामुळे कठीण परिस्थितीतही शुभता टिकून राहील. वैयक्तिक आयुष्य आणि प्रेमसंबंधांमध्ये थोडा कोरडेपणा किंवा जोडीदारासोबत मतभेद होण्याची चिन्हे आहेत. सध्यातरी नवीन प्रेमाची कोणतीही शक्यता दिसत नाही. आज सूर्याला जल अर्पण करणे तुमच्यासाठी शुभ राहील.
धनु राशि (Sagittarius)
आरोग्याची स्थिती उत्तम राहील आणि विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यास व प्रगतीसाठी उत्तम आहे. प्रेमसंबंधात थोडे वाद झाले तरी तुम्ही बुद्धीने योग्य निर्णय घ्याल आणि सिंगल असणाऱ्यांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येईल. विवाहित लोकांसाठी हा काळ वरदानासारखा आहे, फक्त मनाची चंचलता आवरा. आज गणपतीची पूजा करणे योग्य ठरेल.
मकर राशि (Capricorn)
व्यापार आणि उद्योगाच्या दृष्टीने हा अत्यंत शुभ आणि मोठा आर्थिक फायदा देणारा काळ आहे. बुद्धीच्या जोरावर उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील, ज्यामुळे जुन्या आणि नवीन गुंतवणुकीतूनही चांगला धनलाभ होईल. विवाहित लोकांचे जीवन आनंदाचे राहील, पण प्रेमसंबंधात असलेल्यांना थोडे तणावाचे वातावरण जाणवू शकते. आज काली मातेचे स्मरण करावे.
कुंभ राशि (Aquarius)
आरोग्याची स्थिती आज थोडी मध्यम राहील. पोटाच्या विकारांमुळे तुम्ही त्रस्त होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगली प्रगती होईल आणि कोर्ट-कचेरीच्या कामात तुम्हाला यश किंवा विजय मिळेल. लव्ह लाईफसाठी काळ खूप शुभ आहे, फक्त जुने व परिपक्व नाते टिकवण्यासाठी इतर पर्यायांचा विचार मनात आणू नका. आज लाल वस्तूचे दान करावे.
भाग्याची पूर्ण साथ लाभेल, पण शनीच्या प्रभावामुळे आरोग्यामध्ये ऑन-ऑफ चढ-उतार होत राहतील. व्यवसायाच्या दृष्टीने हा अत्यंत शुभ काळ आहे, फक्त कोणत्याही कामात गोंधळून न जाता योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. प्रेमसंबंध आणि मुलांच्या बाबतीत नशीब साथ देईल, जुनेच नाते आता पुन्हा चांगल्या स्थितीत येईल. आज लाल रंगाची वस्तू स्वतःजवळ ठेवावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.