Today wednesday Horoscope Marathi  Saam tv
राशिभविष्य

मनातल्या इच्छा अपूर्ण राहतील, विवाहित लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतील; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार ठरणार आव्हानात्मक

Friday Horoscope in Marathi : मनातल्या इच्छा अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. तर विवाहित लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.

Saam Tv

मेष : आजचा दिवस निर्णय घेण्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. नव्या संधीसाठी प्रामाणिक राहावे लागेल. पार्टनरसोबत चांगला वेळ व्यथित कराल.

वृषभ : संसारात गोडवा निर्माण करण्यासाठी इतरांचा हस्तक्षेप टाळणे फायदेशीर ठरेल. सर्व काही मन आणि ईश्वराच्या इच्छेनुसार होईल. चांगल्या भविष्यासाठी चांगल्या योजना आखाव्या लागतील.

मिथुन : नव्या प्रकल्पासाठी विचार करणे फायदेशीर ठरेल. तुम्हाला मनातल्या इच्छा आज पूर्ण होतील. जुन्या मित्रांची साथ लाभेल.

कर्क : कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवल्यास मन प्रसन्न होईल. कुटुंबातील कमावते व्यक्ती असाल, तर तुम्हाला कमाईच्या इतर स्त्रोताचा विचार करावा लागेल. तुमचं जीवन समृद्ध झाल्यासारखे वाटेल.

सिंह : तुमच्या आयुष्यात महत्वपूर्ण बदल होतील. आर्थिक भरभराट होण्यासाठी धाडसी निर्णय घ्यावे लागतील. परदेशात फिरायला जाण्याची संधी मिळेल.

कन्या : करिअरमध्ये चढ-उतार येण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होतील. नव्या गोष्टी शिकण्यासाठी प्राधान्य द्याल.

तुला : कुटंबातील सदस्य आणि मित्रांचा पाठिंबा मिळेल. चांगल्या भविष्यासाठी सकारात्मक विचार केल्याने फायदा होईल. करिअर आणि नोकरीची नवी संधी चुकवू नका.

वृश्चिक : तुम्हाला प्रकल्पात काम करण्याची संधी मिळेल. कामात घाई करू नका. सार्वजनिक ठिकाणी वैयक्तिक मत मांडणे टाळावेत.

धनु : तुम्हाला दिवसभरात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. पार्टनरसोबत बाहेर जाण्यासाठी वेळ काढाल. आयुष्या नव्या संधी निर्माण होतील.

मकर : तुम्हाला दिवसभरात सकारात्मक बदल जाणवतील. तुमच्यावरील पार्टनरचा विश्वास आणखी वाढेल. दिवसभरात लग्नाचा विचार टाळणे फायदेशीर ठरेल.

कुंभ : आध्यात्मिक होण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. तुम्हाला लोकांकडून मदत आणि पाठिंबा मिळेल. दिवशभरात मोठा निर्णय घेण्याआधी कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांचा सल्ला घ्यावा.

मीन : तुमच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. तुमच्या चांगल्या व्यवहाराने दिवसभरातील काम सोपे होतील. तुम्हाला आर्थिक स्थितीवर लक्ष देण्याची गरज आहे.

Disclaimer : लेखातील माहिती ज्योतिषशास्त्रावरील असून दिवसभरात महत्वाचा निर्णय घेण्याआधी कुटुंबातील वरिष्ठांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : खांद्यावर स्टार, अंगावर खाकी; डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी तरुणी बनली थेट PSI

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT