Shukraditya Yoga saam tv
राशिभविष्य

Shukraditya Yoga : ३६५ दिवसांनी कन्या राशीत बनणार शुक्रादित्य राजयोग; शुक्र-सूर्य यांच्या आशीर्वादाने 'या' राशींना मिळणार पैसा

Shukraditya Yoga : वैदिक शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी सप्टेंबर महिन्यात सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी खास राजयोग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी नवग्रहामध्ये ग्रहांचा राजा सूर्याला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. सूर्य ग्रह दर महिन्याला त्याच्या राशीमध्ये बदल करतो. सूर्य हा सुख, समृद्धी आणि सन्मानाचा कारक मानला जातो. आता सप्टेंबर महिन्यात सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

मात्र कन्या राशीमध्ये शुक्र आधीच उपस्थित असून या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे शुक्रादित्य नावाचा राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. यावेळी काही राशींना करियरमध्ये चांगली संधी मिळणार आहे, तर काही राशींना व्यापारात लाभ होणार आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे.

वृश्चिक रास

या राशीमध्ये अकराव्या घरात शुक्रादित्य योग तयार होणार असून तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकणार आहेत. या काळात व्यवसायात भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. तसंच तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहणार आहे. तुमची निर्णय घेण्याची ताकद वाढेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

मकर रास

या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडेल. प्रत्येक काम वेगाने होणार असून करिअर क्षेत्रामध्ये परदेशात काम करण्याची ऑफर मिळू शकते. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो. व्यवसायातही भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे.

कर्क रास

या राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शुक्राचा संयोग देखील फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या दुसऱ्या घरात शुक्रादित्य राजयोग तयार होणार असून प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकणार आहेत. तुमच्या आवडीच्या कोणत्याही ठिकाणी पोस्टिंग मिळवू शकता.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : रस्ता क्रॉस करताना अपघात, निवृत्त शिक्षिका जागीच ठार

India : सापांना घाबरत नाहीत इथले लोक! भारतातील 'या' गावाचं रहस्य काय?

मोठी बातमी! काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार, आमदारासह एसीपी, डीसीपी घटनास्थळावर, राज्यात खळबळ

Rain Alert : राज्यासाठी पुढील काही तास महत्त्वाचे, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट

Accident : पहाटे महामार्गावर भीषण थरार! ४३ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भयानक अपघात; ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT