Shani Nakshatra Gochar saam tv
राशिभविष्य

Shani Nakshatra Gochar: ३ दिवसांनी शनीदेव बदलणार नक्षत्र; 'या' राशींच्या व्यक्तींना लागणार जॅकपॉट, यशाचे दरवाजे उघडणार

Shani Nakshatra Gochar 2024: शनी एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. अशा परिस्थितीत त्यांना एक राशी चक्र पूर्ण करण्यासाठी सुमारे 30 वर्षे लागतात. शनि राशीच्या चिन्हासह नक्षत्र बदलतो. शनीच्या नक्षत्र बदलाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह हा शनी आहे. शनि हा वैदिक ज्योतिषशास्त्रातील सर्वात प्रभावशाली ग्रहांपैकी एक मानला जातो. शनी एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. अशा परिस्थितीत त्यांना एक राशी चक्र पूर्ण करण्यासाठी सुमारे 30 वर्षे लागतात.

ज्योतिष्य शास्त्रानुसार एका विशिष्ट कालावधीनंतर, शनि राशीच्या चिन्हासह नक्षत्र बदलतो. शनीच्या नक्षत्र बदलाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो. शनि शतभिषा नक्षत्रात स्थित असून 27 डिसेंबर रोजी रात्री 10:42 वाजता पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्राचा स्वामी गुरू आहे. शनीच्या या नक्षत्र गोचरचा कोणत्या राशींच्या व्यक्तींना चांगला परिणाम होणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

पूर्वाभाद्रपद नक्षत्रात शनीचा प्रवेश या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. शनीच्या गुरूच्या नक्षत्रात प्रवेश झाल्यामुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. या काळात ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. यामुळे तुम्हाला पदोन्नती मिळू शकणार आहे. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात.

कन्या रास

पूर्वाभाद्रपद नक्षत्रात शनीचा प्रवेश या राशीच्या लोकांसाठीही शुभ ठरू शकणार आहे. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला खूप फायदा होणार आहे. मानसिक तणावातून आराम मिळू शकतो. शैक्षणिक क्षेत्रात भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफ चांगलं जाणार आहे. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचे नक्षत्र गोचर फायदेशीर ठरू शकणार आहे. शनीच्या कृपेने तुम्हाला मोठ्या आर्थिक लाभासोबतच प्रत्येक क्षेत्रात भरीव यश मिळू शकणार आहे. शारीरिक समस्यांपासून आराम मिळू शकतो. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. तुमची आर्थिक स्थिती चांगली असू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यशवाडी हनुमान मंदिर परिसरातील बचाव कार्य पूर्ण

Jamun Benefits: तुम्हाला पण जांभूळ खायला फार आवडतात? मग वाचा त्याने शरिराला कोणते फायदे होतात?

Anulom Vilom Benefits: प्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास होतात? मग सकाळी १० मिनिटांसाठी करा हे सोपे योगासन

Ratnagiri: बाप्पाचं दर्शन घेऊन बीचवर मज्जा करायला गेले अन् अनर्थ घडला; ५ जणांचा बुडून मृत्यू, नावं आली समोर

Acidity : ॲसिडीटी, पोटदुखीमुळे तुमचं मुल खूप रडतंय? करा ‘हा’ घरगुती उपाय, मिनिटांत वाटेल बरे

SCROLL FOR NEXT