Shani Vakri saam tv
राशिभविष्य

Shani Dev Vakri: 500 वर्षांनंतर गुरुचा उदय आणि शनी होणार वक्री; 3 राशींचे येणार सोन्यासारखे दिवस

Shani Dev Vakri In Meen And Jupiter Rise: काही ग्रह गोचरप्रमाणे त्यांच्या स्थितीतमध्ये देखील बदल करतात. यावेळी ग्रह वक्री आणि उदयाच्या स्थितीला जातात. शनी वक्री आणि गुरुचा उदय कोणत्या राशींना लाभदायक ठरणार आहे ते पाहूयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर गोचर करतात. यामध्ये काही ग्रह गोचर प्रमाणे वक्री आणि उदय देखील होतात. ग्रहांच्या या स्थितीचा देखील प्रत्येक राशीच्या जीवनावर होत असतो. येत्या काळात असंच दोन ग्रह त्यांच्या स्थितीत बदल करणार आहेत.

जुलै महिन्यात कर्माचा कर्ता शनि वक्री होणार आहे. तर दुसरीकडे देवांचा गुरु बृहस्पतिचा उदय होणार आहे. ज्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. या राशींच्या लोकांना उत्पन्नात वाढ आणि करिअरमध्ये पदोन्नतीची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींना मालामाल होण्याची संधी मिळणार आहे ते पाहूयात.

मिथुन रास

शनि आणि गुरु ग्रहाच्या हालचालीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. कर्म घरात शनिदेव वक्री होणार आहे. त्यामुळे, यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. यावेळी तुम्हाला व्यवसायात मोठा नफा आणि नोकरीत बढती मिळेल. कामाच्या ठिकाणी लाभ मिळेल.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचे वक्रदृष्टी आणि गुरु ग्रहाचा उदय सकारात्मक ठरू शकतो. तुमच्या राशीच्या धन घरात गुरु ग्रह उदय होणार आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. गुंतवणुकीसाठीही हा चांगला काळ असणार आहे. तुम्हाला करियरमध्येही चांगली संधी मिळणार आहे.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी शनीचा वक्री आणि गुरूचा उदय फायदेशीर ठरू शकणार आहे. कारण गुरु तुमच्या राशीपासून सातव्या स्थानावर असणार आहे. शनिदेव चौथ्या घरात वक्री स्थितीत असणार आहे. तुम्हाला भौतिक सुखं मिळू शकतात. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आपच्या 7 खासदारांना दिलासा, भाजप प्रवेशाला मंजुरी

Garam Pani Kund In Mandla History: बापरे चमत्कारच! बाराही महिने गरम पाणी वाहणारं हे कुंड नेमकं आहे तरी कुठे?

Pune : पुण्यातील नामंकित कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची रॅगिंग; ५ जणांवर गुन्हा

मुंबईहून १६६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड; भोपाळमध्ये केलं एमर्जन्सी लँडिग

लग्नाचं वचन देऊन Bigg Boss फेम अभिनेत्रीने 9 कोटींना लुटले; NRI तरुणाचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT