Shani 2025 AI
राशिभविष्य

Shani Dev: शनीदेवाच्या या ३ राशी आहेत सर्वात प्रिय; व्यक्तींच्या सर्व इच्छा होतात पूर्ण

Shani Dev Favourite Zodiac: ज्योतिषशास्त्रानुसार, १२ राशींपैकी ३ राशी अशा आहेत ज्या न्यायदेवता शनिदेवाच्या प्रिय आहेत. या राशींना शनीदेव भरभरून संपत्ती देतात. या राशी कोणत्या आहेत ते पाहूयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. यामध्ये शनी देवाचा देखील समावेश आहे. शनी देव प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. अशातच शनीदेवाच्या काही प्रिय राशी आहेत. या राशींना ते भरभरून गोष्टी देतात.

ज्याप्रमाणे मेष राशी हनुमानजी आणि मंगळाशी संबंधित मानली जाते. अशा काही राशी आहेत ज्यांच्यावर शनिदेवाची विशेष कृपा आहे. शनिदेवाच्या कृपेने हे लोक खूप श्रीमंत आहेत. तर हे लोक मेहनती असतात. हे लोक नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मकर

मकर राशीच्या लोकांना शनिदेवाचा विशेष आशीर्वाद असतो. या राशीचे स्वामी आहेत. या राशीच्या व्यक्ती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शांत राहतात. या राशीच्या लोकांनी दर शनिवारी शनि महाराजांची पूजा करावी. यामुळे त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या दूर होऊ लागतात.

कुंभ रास

कुंभ राशीवर शनिदेवाचा विशेष आशीर्वाद आहे. या लोकांना स्वतःच्या अटींवर काम करायला आवडते. शनिदेवाच्या कृपेने या लोकांना धन प्राप्त होतं. आणि त्यांच्या कृपेमुळे त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

तूळ रास

शनिदेवाच्या आवडत्या राशींपैकी एक राशी तूळ आहे. कारण या राशीचा स्वामी शुक्र आहे आणि शनिदेवाची शुक्राशी मैत्री आहे. शनिदेवाच्या कृपेने हे लोक श्रीमंत होतात. या लोकांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता असते. या राशीच्या व्यक्तींनी दर शनिवारी शनी देवाची पुजा करावी.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

SCROLL FOR NEXT