Grah Gochar in December saam tv
राशिभविष्य

Grah Gochar: डिसेंबर महिन्यात ७ ग्रह करणार गोचर; 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

Grah Gochar in December 2024: डिसेंबर लवकरच सुरु होणार असून या महिन्यात देखील अनेक ग्रह गोचर किंवा नक्षत्र बदलणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यात ठराविक ग्रहांचं गोचर होतं. आता वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर लवकरच सुरु होणार असून या महिन्यात देखील अनेक ग्रह गोचर किंवा नक्षत्र बदलणार आहेत. ग्रहांच्या या स्थिती बदलाचा प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर काही ना काही परिणाम होणार आहे.

येत्या काही दिवसांत 9 पैकी 7 ग्रहांचे गोचर होणार आहे. 2024 वर्ष संपण्यापूर्वी ग्रहांचा राजा, ग्रहांचा राजकुमार, कर्मफल देणारा शनि, ग्रहांचा सेनापती त्यांच्या स्थितीत बदल करणार आहे. यावेळी कोणते ७ ग्रह त्यांच्या राशीत बदल करणार असून त्याचा कसा परिणाम होणार आहे ते पाहूया.

शुक्र गोचर

संपत्ती, ऐश्वर्य, प्रेम आणि वैभव देणारा शुक्र डिसेंबर महिन्यात दोनवेळा रास बदलणार आहे. सोमवारी म्हणजेच 2 डिसेंबर रोजी दुपारी 12:05 वाजता शुक्र मकर राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर रात्री 11:48 वाजता शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल.

सूर्य गोचर

ग्रहांचा राजा सूर्य डिसेंबरमध्ये आपली राशी आणि नक्षत्र या दोन्हीमध्ये बदल करणार आहे. रविवार 15 डिसेंबर रोजी रात्री 10:19 वाजता धनु राशीत प्रवेश करणार आहे. याशिवाय रविवारी 29 डिसेंबर रोजी सकाळी 12:34 वाजता पूर्वाषाढ नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

मंगळ गोचर

ग्रहांचा अधिपती मंगळ 7 डिसेंबर रोजी कर्क राशीत वक्री होणार आहे. याचाच अर्थ कर्क राशीत मंगळ उलटी चाल चालणार आहे. या महिन्यात मंगळाच्या नक्षत्रात कोणताही बदल होणार नाही.

बुध गोचर

ग्रहांचा राजकुमार बुध सोमवारी म्हणजेच १६ डिसेंबर रोजी वृश्चिक राशीत मार्गी होणार आहे. याआधी ९ डिसेंबरला तो अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यानंतर २४ डिसेंबर रोजी ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश करेल.

शनी गोचर

कर्म देणारा शनि मार्च 2025 मध्ये आपली राशी बदलणार आहे. परंतु शुक्रवार 27 डिसेंबर रोजी रात्री 10.42 वाजता पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल.

केतू गोचर

सोमवारी 2 डिसेंबर रोजी दुपारी 4:04 वाजता केतू ग्रह स्पष्टपणे उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

चंद्र गोचर

चंद्र हा सर्वात जलद गतीने गोचर करणार ग्रह आहे. तो कोणत्याही राशीमध्ये अडीच दिवस आणि कोणत्याही नक्षत्रात फक्त 1 दिवस राहतो. डिसेंबरमध्येही चंद्र अनेक राशींमध्ये प्रवेश करणार आहे.

कोणत्या राशींचं भाग्य उजळणार

  • वृषभ

  • सिंह

  • मकर

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)


सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

SCROLL FOR NEXT