Dream Astrology saam tv
राशिभविष्य

Dream Science: स्वप्नात 'हा' पक्षी पाहणं मानलं जातं शुभ; लवकरच तुम्हाला होऊ शकतो धनलाभ, पाहा स्वप्न शास्त्रात काय म्हटलंय?

Money Dream Meaning: सनातन धर्मात ड्रीम सायन्स म्हणजेच स्वप्न शास्त्राला खूप महत्त्व आहे. असं मानलं जातं की, स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी आपल्या भविष्यातील घटना दर्शवतात. आपण जाणून घेऊया स्वप्न शास्त्रात दिसणाऱ्या कोणत्या गोष्टींना शुभ मानण्यात येतं.

Surabhi Jayashree Jagdish

तर काही स्वप्न काहीशी भयानक असतात. स्वप्न शास्त्रानुसार, आपण पाहत असलेली स्वप्न आपल्याला भविष्यात घडणाऱ्या इशाऱ्यांबाबत माहिती देतात. शास्त्रानुसार, तुम्हाला पडलेली स्वप्न तुमच्या घरी येणाऱ्या संपत्तीकडे इशारा करतात किंवा तुमच्यावर येणाऱ्या संकटाची चाहूल देतात.

अनेक वेळा एखाद्या आपल्याला स्वप्नामध्ये देवी-देवता दिसू लागतात. तर काही वेळा स्वप्नामध्ये प्राणी आणि पक्षी पाहतो. स्वप्नामध्ये प्राणी किंवा पक्षी दिसण्याचा नेमका अर्थ काय असतो हे तुम्हाला माहिती आहे का?

मधमाशीचं पोळं पाहणं

आपण अनेकदा अशी स्वप्न पाहतो, ज्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात काहीही संबंध नसतो. जर तुम्हाला कधी स्वप्नात मधमाश्याचं पोळं दिसलं तर हे शुभ मानलं जातं. स्वप्न शास्त्रानुसार, असं स्वप्न पाहिल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात वाढ होते.

स्वप्नामध्ये पोपट दिसणं

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात कोणत्याही जातीचा पोपट दिसला तर हे स्वप्न शुभ मानलं जातं. असं म्हणतात, असा स्वप्नाने तुमच्या घरी लवकरच भरपूर पैसा येणार आहे. त्याशिवाय तुम्हाला करियरमध्ये चांगली संधी मिळण्याचीही शक्यता असते.

झाडावर भरपूर फळं दिसणं

स्वप्न शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात झाडाला भरपूर फळं लागलेली दिसतं असतील तर हे देखील तुमच्यासाठी लाभदायक आहे. यावेळी तुमचं भाग्य लवकरच चमकणार असल्याचे हे संकेत असू शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला अचानक कुठून तरी पैसाही मिळू शकतो.

देवतांचं दर्शन होणं

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नामध्ये देवी-देवतांचे दर्शन होत असेल तर ते देखील खूप शुभ स्वप्न मानलं जातं. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, आगामी काळात तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकाचवेळी खात्यात येणार ₹4,000? जाणून घ्या सत्य

Pitod Recipe : भाजी संपलीय? मग झटपट बनवा खमंग 'पितोड', चवीला लागेल भन्नाट

Political News: मोठी बातमी! 'त्या' २० बंडखोर खासदारांना झटका, सुप्रीम कोर्टाने बजवली नोटीस

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

आताची सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठी संधी; भाजपच्या 'या' सर्वात ताकदवर समितीत होणार एन्ट्री?

SCROLL FOR NEXT