shani ast  saam tv
राशिभविष्य

Shani Ast: फेब्रुवारी अखेरीस शनीचा होणार अस्त; 40 दिवस 'या' राशी झेलणार शनीची साडेसाती, होणार तगडं नुकसान

Shani Ast 2025 Rashifal: २८ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ०७:०६ वाजता शनी अस्त होणार असून ०९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ०५:०३ वाजता उदयाला जाणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह अस्त आणि उदय देखील होतात. सध्या फेब्रुवारी महिना सुरु असून या महिन्यात शनी देव अस्त होणार आहेत. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ०७:०६ वाजता शनी अस्त होणार असून ०९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ०५:०३ वाजता उदयाला जाणार आहे.

शनीच्या स्थितीतील बदल मेष ते मीन राशीपर्यंतच्या राशींवर परिणाम करणार आहे. फेब्रुवारीमध्ये शनि ४० दिवसांसाठी अस्त होणार आहे. शनीच्या अस्ताच्या स्थितीचा काही राशींवर विपरीत परिणाम होणार आहे. या काळात काही राशींना आर्थिक, शारीरिक आणि कौटुंबिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागणार आहे. शनीचा कोणत्या राशींवर कोप होऊ शकतो ते पाहूयात.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी शनी अकराव्या घरात अस्त होणार आहे. शनीच्या प्रभावामुळे कुटुंबात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे संभाषणात संतुलन आणि संयम राखावा लागणार आहे. कोणताही निर्णय खूप विचारपूर्वक घेणं फायदेशीर ठरेल.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांवर शनीचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कामात अडचणी येऊ शकतात. पैशांशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला अडचणी येणार आहेत. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतात.

सिंह रास

सिंह राशीच्या सातव्या घरात शनी अस्त असणार आहे. यामुळे तुमच्या व्यवसायात अडचणी येऊ शकतात. जोडीदारावर लक्ष ठेवा तो तुम्हाला फसवण्याची शक्यता आहे. वादविवादांपासून अंतर ठेवा. आर्थिक समस्या वाढू शकतात.

मकर रास

मकर राशीच्या लोकांच्या दुसऱ्या घरात शनी अस्त करत आहे. शनि अस्त झाल्यामुळे तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. तुम्हाला मानसिक आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुरावर लहान मुलांच्या शाळेच्या बसमध्ये बिघाड

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT