Shani Enter Shatabhisha Nakshatra saam tv
राशिभविष्य

Shani Nakshatra Gochar: शनीदेव करणार राहुच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींवर बरसणार पैसा

Shani Enter Shatabhisha Nakshatra: शनीदेव त्यांच्या राशीप्रमाणे नक्षत्रामध्येही बदल करतात. यावेळी शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव कोणत्या राशींवर होणार आहे, ते पाहूया.

Surabhi Jayashree Jagdish

प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. राशींप्रमाणे काही ग्रह नक्षत्रामध्ये देखील बदल करतात. ग्रहांच्या नक्षत्र गोचरचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतोय. येत्या काळात शनी देव त्यांच्या नक्षत्रामध्ये बदल करणार आहेत.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ३ ऑक्टोबर रोजी शनीदेव राहुच्या शतभिषा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. शनीच्या नक्षत्र गोचरमुळे काही राशींच्या आयुष्यात मोठे आणि चांगले बदल होणार आहेत. यावेळी कोणत्या राशीचं भविष्य उजळणार आहे, ते पाहूयात.

मेष रास

शनिदेवाच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरीमध्ये चांगल्या संधी मिळणार आहेत. तुमच्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याचीही शक्यता आहे. करिअरसाठीही हा काळ अतिशय योग्य आहे. तुम्हाला अचानक प्रलंबित पैसे मिळू शकतात.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचा नक्षत्र बदल अनुकूल ठरू शकणार आहे. यावेळी आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल दिसून येणार आहेत. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळण्याची चिन्ह आहे. नातेवाईकांकडून तुम्हाला मान-सन्मान मिळेल. तुमच्या आयुष्यात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील.

मकर रास

शनिदेवाच्या नक्षत्रात झालेला बदल तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. शनिदेव तुमच्या राशीतून दुसऱ्या भावात प्रवेश करणार आहे. व्यावसायिकांना मोठा पैसा मिळू शकणार आहे. नोकरी आणि व्यवसायातही तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकणार आहे. तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

SCROLL FOR NEXT