saturn to enter jupiter nakshatra saam tv
राशिभविष्य

Shani Gochar: न्यायाधीश शनी नक्षत्रात करणार बदल; 'या' राशींचं आयुष्य सुखाने भरणार, धनलाभही होणार

Shani Gochar 2025: ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह ठराविक वेळेनंतर राशी आणि नक्षत्रात बदल करणार आहे. यंदाच्या एप्रिलमध्ये शनी नक्षत्रामध्ये गोचर करणार आहे. यामुळे काही राशींना सुख मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, शनी हा सर्वात शक्तीशाली ग्रह मानला जातो. जेव्हाही शनीच्या स्थितीत कोणताही बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो. शनी अडीच वर्ष जवळपास एकाच राशीमध्ये राहतो आणि १ वर्षानंतर त्याच्या नक्षत्रामध्ये देखील परिवर्तन करतो.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, शनी सध्या मीन राशीमध्ये विराजमान आहे. ३ दिवसांनी म्हणजेच २८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी शनी देव नक्षत्र गोचर करणार आहे. यावेळी उत्तर भाद्रपद नक्षत्रामध्ये गोचर करणार आहेत. या गोचरमुळे काही राशींच्या आयुष्यात चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींना फायदा मिळणार आहे ते पाहूयात.

सिंह रास

शनीच्या नक्षत्र गोचरमुळे या राशींच्या जीवनात अनेक मोठे बदल घडणार आहेत. तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यात सुधारणा होणार आहे. व्यवसायात सर्व कामात यश मिळू शकतं. नव्या नोकरीच्या संधी चालून येणार आहेत.

कर्क रास

शनीच्या नक्षत्र गोचरमुळे या राशींना अडचणींपासून आराम मिळणार आहे. बराच काळ तुमची जी कामं थांबली असतील तर ती पूर्ण होणार आहेत. कुटुंबातील वाद संपुष्टात येणार आहेत. तुमच्या आयुष्यात अनेक शुभ गोष्टी घडणार आहेत. तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास

शनीच्या नक्षत्र गोचरमुळे तुम्हाला चांगला नफा मिळू शकणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद येणार आहे. तुम्हाला ऑफिसच्या कामामध्ये इतरांची मदत मिळेल. कोर्टाच्या कोणत्याही प्रकरणात तुमचा विजय होणार आहे. नोकरीत तुम्हाला चांगली संधी मिळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात पावसाला सुरुवात, पुणेकरांना तात्पुरता दिलासा

Kidney Stone Symptoms : पाठदुखी करू नका दुर्लक्षित, असू शकतो किडनी स्टोनचा धोका; डॉक्टरांनी सांगितली ४ गंभीर लक्षणं

कोरड्या त्वचेसाठी सर्वात भारी उपाय! 'दूध-हळदीचा' फेसपॅक

Tax free income: कोणकोणत्या कमाईवर सरकार टॅक्स लावत नाही?

ऑपरेशन टायगर फेल? उद्या मातोश्रीवर येतो; ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंना निरोप?

SCROLL FOR NEXT