Shani Vakri 2024 saam tv
राशिभविष्य

Shani Vakri 2024: शनीची वक्री स्थिती ठरणार धोकादायक; 'या' राशींवर घोंगावणार संकटाचे ढग

Shani Vakri 2024: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, २९ जून रोजी शनी देव वक्री अवस्थेत गेले आहेत. शनी देवाची वक्री स्थिती सर्व राशींच्या व्यक्तींवर प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक वेळेनंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. या नऊ ग्रहांपैकी सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह म्हणजे शनी देव. शनी देवाला न्याय देवता देखील म्हटलं जातं. ज्यावेळी शनी देव त्यांच्या राशीमध्ये बदल करतात त्यावेळी त्याचा परिणाम प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर होत असतो.

सध्या शनी देव कुंभ राशीमध्ये वक्री चाल चालत असून पूर्ण १३९ दिवश शनी वक्री स्थितीत राहणार आहे. २९ जून रोजी शनी देव वक्री अवस्थेत गेले आहेत. यानंतर १५ नोव्हेंबर २०२४ ला शनी कुंभ राशी मार्ग्रस्थ होणार आहे.

शनी देवाची वक्री स्थिती सर्व राशींच्या व्यक्तींवर प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर याचा विपरीत परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया शनीच्या वक्री स्थितीचा कोणत्या राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे.

मकर रास

शनीच्या वक्री स्थितीचा नकारात्मक प्रभाव मकर राशीच्या लोकांवर पडणार आहे. या काळात तुम्हाला अनेक जबाबदाऱ्या मिळणार आहे. या तुमच्यासाठी धोकादायक ठरतील. जोडीदाराची तब्येत गडबडणार आहे. अभ्यास, मुलाखती इत्यादी कोणत्याही कामासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त मेहनत करावी लागणार आहे. आर्थिक व्यवहार करताना सावध राहावं.

कुंभ रास

शनि तुमच्या राशीत वक्री असून या राशीच्या लोकांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागणार आहे. कोणतंही नवीन किंवा महत्त्वाचं काम सुरू करणं टाळलं पाहिजे. तुमच्या पार्टरनशी वाद होऊ शकतो. वादापासून दूर राहणं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे.

मीन रास

या राशीच्या लोकांना शनी वक्री काळात म्हणजेच १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व गोष्टींची काळजी करावी लागणार आहे. नोकरीच्या ठिकाणी निराशा झाल्यामुळे नवीन नोकरीचा शोध घ्यावा लागणार आहे. छोटीशी चूक तुमचं मोठं नुकसान करू शकते. नशिबाची फारशी साथ मिळणार नाही.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT