Shani Vakri 2025 Saam Tv
राशिभविष्य

Shani Vakri : पुढच्या वर्षी शनीची वक्री चाल 'या' राशींना करणार मालामाल; प्रत्येक कामातून मिळणार छप्परफाड पैसा

Shani Vakri 2025: शनीची उलटी हालचाल 12 राशींच्या जीवनावर परिणाम करू शकते. या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीत बदल करतो. या ग्रहांमध्ये शनी हा सर्वात खास ग्रह मानला जातो. कर्म देवता शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. तो सुमारे अडीच वर्षे एकाच राशीत राहणार आहे. 2025 मध्ये शनी आपली मूळ त्रिकोण राशी कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करेल.13 जुलै 2025 रोजी सकाळी 9:36 वाजता ते वक्री चाल चालणार आहे.

शनि सुमारे 138 दिवस वक्री स्थितीत राहील. शनीची उलटी हालचाल 12 राशींच्या जीवनावर परिणाम करू शकते. या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे ते पाहूयात.

कर्क रास (Kark Zodiac)

मीन राशीतील शनीची वक्री चाल या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या राशीच्या नवव्या घरात शनि प्रतिगामी होणार आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होणार आहे. संपत्तीत वाढ होऊ शकणार आहे. यासोबतच कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येणार आहे. तुमच्या अनेक इच्छा पूर्णही होऊ शकतात. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकणार आहात.

मीन रास (Meen Zodiac)

या राशीच्या चढत्या घरात शनि वक्री राहणार आहे. या राशीच्या लोकांनाही बरेच फायदे मिळू शकतात. या राशीच्या व्यक्ती अगदी राजासारखे जीवन जगतील. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून त्यांना भरपूर पैसा आणि नफा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या मनाजोग्या गोष्टी घडणार आहेत.

वृषभ रास (Vrishabha Zodiac)

या राशीमध्ये शनि अकराव्या घरात वक्री असणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनाही बरेच फायदे मिळू शकतात. शैक्षणिक क्षेत्रातही तुम्हाला भरपूर लाभ मिळू शकतात. नोकरदार लोकांसाठीही हा काळ उत्तम असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. यामुळे कर्जापासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. कामात यश मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT