Horoscope Today 31th July 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : जुलै महिन्याचा शेवटच्या दिवशी या व्यक्तींची होणार भरभराट; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग - बुधवार दिनांक - ३१ जुलै २०२४

आषाढ कृष्णपक्ष. तिथी - एकादशी. नक्षत्र - रोहिणी. योग - ध्रुव. करणबालव. रास - वृषभ. दिनविशेष - उत्तमदिवस

मेष : खर्च होण्याचा दिवस

शारीरिक तब्येत नाजूक असेल. विनाकारण हॉस्पिटलवर खर्च होण्याचा दिवस आहे. मनस्ताप टाळा. उपासना पाळा.

वृषभ : स्वप्ने सुद्धा होतील

आज मदहोंश हुआं जायें रें.. असा आजचा दिवस आहे. सुखाचे स्वप्न रंगवाल आणि ती स्वप्ने पूर्ण सुद्धा होतील. काही सुसंधी घेऊन आजचा दिवस आलेला आहे.

मिथुन : गुंतवणूक फायदेशीर ठरेल

"तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं" अशा गोष्टी पैसा जोडण्यासाठी मनात येतील. पैशाचा योग्य विनियोग कराल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल .

कर्क : चांगले संबंध राहतील

स्वभावताच असणाऱ्या सर्व गोष्टी आज करण्याचा दिवस आहे. मनाप्रमाणे वागाल इतरांनाही आपले वागणे आवडेल. शेजारी चांगले संबंध राहतील.

सिंह : मनस्वास्थ बरे राहील

दान, दानत चांगली राहील. मनस्वास्थ बरे राहील. कधीतरी आपल्याला काय चांगले वाटते यापेक्षा दुसऱ्याला बरे वाटते म्हणून त्या गोष्टी करण्याचा जो दिवस आहे तो आजचा आहे.

कन्या : लॉटरीत फायदा होईल

शेअर्स, लॉटरी यामध्ये फायदा होईल. उपासना फलदायी ठरेल. संतती सौख्यासाठी दिवस चांगला.

तूळ : नोकरीमध्ये कटकटी वाढतील

नोकरीमध्ये कटकटी वाढतील. नोकर नोकरांच्यामध्ये दरी निर्माण होईल. आपल्याविषयी उगाचच कोणीतरी कान फुंकत आहे अशी जाणीव राहील. काळजी घ्या.

वृश्चिक : व्यवसाय व्यापार वाढेल

न बोलता संयमाने कामे कराल. कोर्टकचेरीचे निकाल मनाप्रमाणे लागतील. आजचा दिवस आपलाच आहे. त्याचा सर्व फायदाही आपलाच होईल. व्यवसाय व्यापार वाढेल.

धनु : चानक धनलाभाचे योग

धावपळ, कटकटींचा सामना आज आपल्याला करायला लागेल. अचानक धनलाभाचे सुद्धा योग आहेत. परिस्थितीशी दोन हात करा.

मकर : आजचा दिवस आपलाच

देवाने दिलेल्या गोष्टींमध्ये थोडेही आपल्याला दान कमी मिळत नाही अथवा अधिक काही गोष्टी मिळत नाहीत. भाग्यातलं कोणी हिरावूनही घेत नाही. समाधानाने दिवस कंठा तर आजचा दिवस आपलाच आहे.

कुंभ : सामाजिक क्षेत्रात प्रगतीचा दिवस

कामाच्या ठिकाणी आपलाच डंका असेल. शांतपणे मन लावून काम कराल. सामाजिक क्षेत्रात प्रगतीचा दिवस आहे.

मीन : हौस पूर्ण होण्याचा दिवस

जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील. परदेशाशी निगडित व्यवहार होतील. काही भाषा शिकण्याची आवड असेल तर आज ती हौस पूर्ण होण्याचा दिवस आहे. आजच सुरुवात करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT