September 2024 Triple Rajyog saam tv
राशिभविष्य

September 2024 Rajyog : ५०० वर्षांनंतर तयार होणार शश, मालव्य सह ३ राजयोग; 'या' राशींच्या घरी बरसणार पैसा

September 2024 Triple Rajyog : सप्टेंबर महिन्यात 3 राजयोग तयार होणार आहेत. हे तीन राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

एका ठराविक काळानतंर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, या राजयोगांचा परिणाम मानवी जीवनावर आणि देशावर आणि जगावर परिणाम होतो. सप्टेंबर महिन्यात 3 राजयोग तयार होणार आहेत. ज्यांचा प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे.

या काळामध्ये शनी स्वतःच्या कुंभ राशीत भ्रमण करत असून त्यामुळे शश राजयोग तयार होतोय. ग्रहांचा राजकुमार बुध 23 सप्टेंबर रोजी स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश करून भद्रा राजयोग तयार करणार आहे. तर शुक्र देखील 18 सप्टेंबर रोजी स्वतःच्या राशीत तूळ राशीत गोचर करणार असून यामुळे मालव्य राजयोग निर्माण होणार आहे.

हे तीन राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात या राशींना पैसा आणि सन्मान मिळू शकणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींना अधिक लाभ होऊ शकतो.

मेष रास

तीन राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. यावेळी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. ऑफिसमध्ये सर्वजण तुम्हाला मदत करतील. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा करिअरमध्ये प्रगतीसह पूर्ण होऊ शकते. तुमची इच्छा या महिन्यात पूर्ण होऊ शकते. देश-विदेशात प्रवास करू शकता.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी तीन राजयोगांची निर्मिती फायदेशीर ठरणार आहे. प्रत्येक कार्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण मदत मिळेल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले पैसे परत मिळू शकतात.

वृषभ रास

तीन राजयोगांची निर्मिती वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. ऑफिसमधील इतर व्यक्ती तुम्हाला प्रत्येक बाबतीत मदत करतील. तुमच्या मनात सकारात्मक विचार वाढतील. तुम्ही तुमच्या आर्थिक खात्यांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असाल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम असणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT