panchak saam tv
राशिभविष्य

Panchak September 2024: उद्यापासून लागणार राज पंचक; या काळात चुकूनही करू नका 'ही' कामं

Panchak 2024 Date: १६ सप्टेंबरपासून राज पंचक सुरू होतोय. या काळात कोणती कामं करणं टाळलं पाहिजे ते जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्योतिष्य शास्त्राला मोठं महत्त्व देण्यात आलं आहे. मात्र या शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये शुभ कार्य करण्यास मनाई आहे. या काळात केलेल्या कामांमुळे तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

ज्योतिष्य शास्त्रांमध्ये काही नक्षत्रांचे वर्णन केलं आहे. यामध्ये पंचकबाबत माहिती दिली असून ज्यामध्ये काही काम केल्याने तुमचं नुकसान होऊ शकतं, असं मानलं जातं. वैदिक कॅलेंडरनुसार १६ सप्टेंबरपासून राज पंचक सुरू होतोय. जाणून घेऊया या काळात कोणती कामं करणं टाळलं पाहिजेत.

पंचकची वेळ काय आहे?

हिंदू कॅलेंडरनुसार, सोमवारी १६ सप्टेंबर रोजी म्हणजेच उद्या पहाटे ५:४६ वाजता पंचक सुरू होणार आहे. हे पंचक गुरुवारी म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी सकाळी 08:04 पर्यंत चालणार आहे.

पंचकमध्ये ही कामं करणं टाळलं पाहिजे

  • पंचकच्या काळामध्ये गवत किंवा लाकूड अशा जळणाऱ्या वस्तू गोळा करू नये. या वस्तू या काळात जमा केल्याने आगीचा धोका संभवतो.

  • या काळामध्ये खाट बांधणं अशुभ मानलं जातं. यामुळे तुम्हाला भविष्यात त्रास होण्याचा धोका असतो.

  • या काळात दक्षिण दिशेला प्रवास करणं टाळावं. कारण ही दिशा यम आणि पितरांची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला प्रवास करू नये.

  • या वेळी घराचं छप्पर बांधणं किंवा त्याचं काम करणं टाळलं पाहिजे. असं केल्यास हानि होऊ शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT