Rahu Gochar In Meen saam tv
राशिभविष्य

Rahu Gochar 2026: पुढच्या वर्षी राहू करणार शनीच्या राशीत प्रवेश; 'या' राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ

Rahu transit to Saturn sign: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचा गोचर आणि त्याची स्थिती मानवी जीवनावर दूरगामी परिणाम करते. विशेषतः सावली ग्रह म्हणून ओळखला जाणारा राहु हा एका राशीत सुमारे १८ महिने राहतो.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रामध्ये राहूला पापी ग्रह मानण्यात येतं. यामध्ये राहू ग्रह तो सुमारे 18 वर्षांनी त्याच्या राशीत बदल करतो. राहु आणि केतू हे ग्रह नेहमी उलट दिशेने म्हणजे वक्री चाल करतात. पुढच्या वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये राहू त्यांच्या राशीत गोचर करणार आहे.

वर्ष 2026 मध्ये राहु कुंभ राशीतून शनि स्वामित्वाच्या मकर राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरामुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. आकस्मिक धनलाभ, सामाजिक प्रतिष्ठा आणि भाग्योदयाचे योग तयार होणार आहे. यावेळी कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते पाहूयात.

धनु राशी (Sagittarius)

धनु राशीच्या व्यक्तींसाठी राहु ग्रहाचा गोचर अत्यंत अनुकूल ठरू शकणार आहे. कारण राहु या राशीच्या धन आणि वाणी भावात वक्री स्थितीत भ्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात वेळोवेळी आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुनी रखडलेली कामं पुन्हा गती घेणार आहेत.

वृषभ राशी (Taurus)

वृषभ राशीच्या जातकांसाठी राहुची उलटी चाल अत्यंत सकारात्मक ठरू शकणार आहे. राहु या राशीच्या एकादश भावात भ्रमण करणार आहे, ज्यामुळे उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना मोठ्या व्यावसायिक डील्स मिळू शकणार आहे. ज्या अत्यंत लाभदायक ठरतील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन राशी (Gemini)

मिथुन राशीच्या वयक्तींसाठी राहु ग्रहाची उलटी चाल लाभदायक ठरू शकणार आहे. कारण राहु या राशीच्या कर्म भावात भ्रमण करणार आहे. त्यामुळे कामकाजात प्रगतीचे योग तयार होतील. व्यापारिक प्रवास फायदेशीर ठरतील आणि नवीन व्यावसायिक संधी मिळणार आहेत. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळेल आणि व्यवसायात विस्तार होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटाप्रकरणी दोघे ताब्यात, हत्येची सुपारी देणारा बडा नेता कोण?

Ind vs Aus: भारताच्या धारदार गोलंदाजीसमोर बॅटिंग ढासळली; सिरीजमध्ये टीम इंडिया आघाडीवर

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Bihar Election: उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला घेराव; वाहनांवर दगड, शेणफेक, बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न, मतदानावेळी तुफान राडा

Indurikar Maharaj Daughter Engagement Photos: किर्तनकार इंदुरीकर महाराजांचा जावई कोण आहे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

SCROLL FOR NEXT