Shani Margi Guru Vakri saam tv
राशिभविष्य

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

Guru Margi 2025: तब्बल १२ वर्षांनी हा बदल होणार असून यावेळी काही राशींच्या व्यक्तींना खास लाभ होऊ शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, गुरु लवकरच त्याच्या स्थितीत बदल करणार आहे. पुढच्या वर्षी गुरु मार्गस्थ होणार आहेत. गुरु १२ वर्षांनंतर मार्गी होणार असून काही राशींच्या लोकांना नोकरी, व्यवसाय, विवाह आणि प्रेमाच्या बाबतीत यश मिळू शकतं.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 2025 मध्ये गुरु ग्रहाद्वारे राशीमध्ये मोठा बदल होणार आहे. 14 मे 2025 रोजी गुरू वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. तब्बल १२ वर्षांनी हा बदल होणार असून यावेळी काही राशींच्या व्यक्तींना खास लाभ होऊ शकतात. यावेळी कोणत्या रासींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहेत ते पाहूयात.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी ग्रह मार्गी असणं फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायात प्रगती झाल्याने समाजात मान-सन्मान वाढणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेलं काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांना 2025 मध्ये गुरु ग्रहाच्या गोचरमुळे चांगले परिणाम मिळणार आहेत. धनवृद्धीसोबतच व्यवसायातही वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा प्रेमविवाह होऊ शकतो. व्यवसायात प्रगती होऊ शकते.

मीन रास

घाईघाईने निर्णय घेणं योग्य ठरणार नाही. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार आहे. तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल कराल आणि समाजात तुमचा सन्मान वाढणार आहे. या काळात तुम्हाला परदेशात जाण्याची शक्यता मिळणार आहे. सामाजिक कार्य करणं फायदेशीर ठरू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT