Budh Gochar In October saam tv
राशिभविष्य

Budh Gochar: ऑक्टोबरमध्ये २ वेळा गोचर करणार राजकुमार बुध; 'या' राशींच्या तिजोरीत अचानक येणार पैसा

Budh Gochar In October: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रह दोन वेळा रास बदलणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

प्रत्येक ग्रह त्याच्या ठरलेल्या वेळी राशीमध्ये बदल करतो. यावेळी दर महिन्याला देखील काही ग्रह गोचर करतो. मात्र येत्या महिन्यात बुध ग्रह दोन वेळा त्याच्या राशीमध्ये बदल करणार आहे. ऑक्टोबर महिन्यात ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह २ वेळा गोचर करणार आहे, यामुळे काही राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहेत.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुध ग्रह पहिल्यांदा 10 ऑक्टोबर रोजी तूळ राशीत गोचर करणार आहे. तर 29 ऑक्टोबरला बुध पुन्हा वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. याशिवाय काही राशींना अचानक पैसे मिळाल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

तूळ रास

बुध ग्रहाचं गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे . या काळात तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारणार आहे. नोकरी करणाऱ्यांनाही प्रमोशन मिळू शकणार आहे. तुमचे तुमच्या वडिलांसोबतचे नाते अधिक घट्ट होणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळू शकणार आहे.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं गोचर शुभ ठरू शकणार आहे. या काळात अनेक महत्त्वाच्या लोकांशीही तुमची ओळख होणार आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवनही उत्तम असणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे खूप कौतुकही मिळू शकतं. व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. तुम्हाला अचानक कुठून पैसे मिळू शकतील.

कुंभ रास

बुध ग्रहाचं गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात नशीब तुम्हाला साथ देणार आहे. करिअरच्या प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होणार आहेत. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशनही मिळू शकणार आहे. पैशांची बचत करण्यात तुम्हाला यश मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही प्रोजेक्टद्वारे यश आणि प्रसिद्धी मिळेल.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काळीज पिळवटून टाकणारी बातमी! कीर्तन करणाऱ्या भाविकांना कारने चिरडले, ५ जणांचा जागीच मृत्यू; परिसरात शोककळा

Nashik Fort : ३,५०० फूट उंचीवरचा सह्याद्रीतील लपलेला खजिना, नाशिकला गेल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

High cholesterol: हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेलं कोलेस्ट्रॉल कसं कमी करायचं? डॉक्टरांनी सांगितले 3 साधे आणि सोपे उपाय

Maharashtra News Live Update : जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसीला डी प्लस दर्जा प्राप्त गुलाबराव पाटलांची माहिती

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय! 'त्या' अपात्र महिलांची पुन्हा पडताळणी होणार

SCROLL FOR NEXT