Shukra-Rahu Yuti saam tv
राशिभविष्य

Shukra-Rahu Yuti: 28 जानेवारी रोजी मीन राशीत एकत्र येणार शुक्र-राहू; 'या' राशींना लागणार लॉटरी

Shukra-Rahu Yuti 2025 : शुक्र 28 जानेवारी 2025 रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी राहू आधीच मीन राशीत उपस्थित आहे.

Surabhi Jayashree Jagdish

एका ठराविक वेळेला ग्रह त्यांच्या राशीमध्ये गोचर करतात. एकाच राशीमध्ये दोन ग्रहांची युती निर्माण झाली की त्याचा प्रभाव सर्व राशींवर होतो. शुक्र 28 जानेवारी 2025 रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी राहू आधीच मीन राशीत उपस्थित आहे. अशा स्थितीत मीन राशीत शुक्र आणि राहूचा संयोग होणार आहे.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, शुक्र आणि राहूचा संयोग अत्यंत शुभ आणि काही राशींसाठी विशेष परिणाम देणारा सिद्ध होणार आहे. 31 मे पर्यंत शुक्र मीन राशीत राहणार आहे. राहु 18 मे रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. अशाप्रकारे 18 मे पर्यंत मीन राशीत राहू आणि शुक्राची युती राहणार आहे. यावेळी काही राशींना चांगले परिणाम मिळू शकणार आहेत. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या 10व्या घरात शुक्राचं भ्रमण होणार आहे. शुक्र आणि राहूचा संयोग तुम्हाला सुखद परिणाम देणार आहे. या काळात तुम्हाला जमीन, इमारत आणि वाहन खरेदी करण्यात यश मिळणार आहे. तुम्हाला तुमचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे गोचर पाचव्या घरात होणार आहे. या काळात तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. या काळात तुम्हाला मित्रांकडून सहकार्य मिळणार आहे. व्यापाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. व्यवसायात विस्तारही होऊ शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकणार आहे.

मीन रास

शुक्र फक्त मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत मीन राशीच्या लोकांना शुक्र आणि राहूचा युती आर्थिक लाभ देणार आहे. भावा-बहिणींशी संबंध सुधारू शकणार आहेत. वैवाहिक जीवन आनंदी राहण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना लाभाच्या संधी मिळू शकणार आहेत. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात.

कुंभ रास

कुंभ राशीच्या दुसऱ्या घरात शुक्राचं भ्रमण होणार आहे. शुक्राच्या गोचरमुळे तुम्हाला सुख-शांती मिळणार आहे. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची चिन्हं आहेत. कौटुंबिक वातावरण चांगलं राहणार आहे. सुदैवाने काही कामे मार्गी लागू शकतात. रखडलेली कामं पूर्ण होणार आहेत

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT