Numerology symbols representing lucky birth dates and positive planetary influence for women. saam tv
राशिभविष्य

Numerology Lucky Women: या तारखांना जन्मलेल्या महिला असतात लकी; नवऱ्याच्या आयुष्यात आणतात सूख, धन अन् प्रसिद्धी

Numerology Lucky Women: काही महिला त्यांच्या पतींना विशेष यश, सौभाग्य आणि संपत्ती मिळवून देऊ शकतात? अंकशास्त्रात विशिष्ट जन्म क्रमांकाच्या चौथ्या दिवशी जन्मलेल्या महिला त्यांच्या पतींसाठी अत्यंत भाग्यवान मानल्या जातात.

Bharat Jadhav

  • अंकशास्त्रानुसार जन्मतारीख व्यक्तीचे भाग्य ठरवते

  • काही मूलांकाच्या महिला पतीसाठी अत्यंत शुभ मानल्या जातात

  • अशा महिलांमुळे धन, यश आणि प्रसिद्धी मिळते

अंकशास्त्रात एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेपासून मिळणाऱ्या संख्येला त्यांची मूळ संख्या म्हणजे मुलांक म्हणतात. ही संख्या व्यक्तीचा स्वभाव, विचार, वर्तन आणि त्याचे आयुष्य कसे असेल हे दर्शवत असते. १ ते ९ पर्यंतचा प्रत्येक अंक एखाद्या ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते. यावरून, व्यक्तीच्या जीवनावर ग्रहांचा प्रभाव असल्याचं दिसून येते. कोणत्या अंकातील महिला त्यांच्या पतींसाठी अत्यंत भाग्यवान ठरतात. ज्या त्यांना यश, सौभाग्य आणि संपत्ती मिळून देतात ते जाणून घेऊया.

मूलांक २ या अंकाचे विशेष महत्त्व

२ ही संख्या महिन्याच्या २, ११, १९ किंवा २० तारखेला जन्मलेल्या महिलांशी संबंधित आहे. या संख्येचा स्वामी ग्रह चंद्र आहे. चंद्र हा मन, भावना, कोमलता आणि शांतीचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच २ क्रमांकाची स्त्री सौम्य आणि संतुलित स्वभावाची मानली जाते.

स्वभाव आणि व्यक्तिमत्व

२ मुलांकाची महिला भावनिकदृष्ट्या मजबूत असते. तिचे वर्तन सभ्य आणि गोड असते. ती इतरांचे लक्षपूर्वक ऐकते आणि कठोर न होता उपाय शोधण्यावर विश्वास ठेवते. तिच्या शांत स्वभावामुळे घरात आनंददायी वातावरण राहते. कठीण परिस्थितीतही त्या धीर धरत असतात.

पतीसाठी लकी ठरतात

अंकशास्त्रानुसार, २ मुलांक असलेली स्त्री लग्नानंतर तिच्या पतीच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणत असते. त्यांचा पाठिंबा त्यांच्या पतीला मानसिक स्थैर्य देत असतात. या महिला त्यांच्या निर्णयांमध्ये भावनिक संतुलन जोडत असतात. ज्यामुळे त्यांच्या पतींना कामाच्या ठिकाणी योग्य निर्णय घेण्यास मदत होत असते. यामुळे संपत्ती, सन्मान आणि प्रगतीच्या शक्यता बळकट होत असतात.

नातेसंबंध टिकवण्याची कला

ही महिला नातेसंबंधांना खूप गांभीर्याने घेत असते. कुटुंब आणि वैवाहिक जीवनाला त्या प्राधान्य देत असतात. त्या जोडीदाराच्या समस्या समजून घेत असतात. त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना मदत सुद्धा करतात. त्यांचा विश्वास आणि समर्पण तिच्या पतीला आतून बळकट करत असते.

सौंदर्य आणि सकारात्मकता

चंद्राच्या प्रभावामुळे २ मुलांक असलेल्या महिला आकर्षण असतात. त्यांचे हास्य आणि वागण्याने सकारात्मक ऊर्जा पसरते. ज्यामुळे त्यांच्या घरात आनंद आणि शांतीचे वातावरण निर्माण होत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

SCROLL FOR NEXT