numerology number 3 in Marathi Saam TV
राशिभविष्य

Numerology Number 3 : या तारखांना जन्मलेले व्यक्ती आयुष्यात मिळवतात मोठं यश; तुमचा भाग्यांक कोणता?

numerology number 3 career : ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याचा ३, १२, २१, ३० या तारखांना झाला आहे त्यांचा भाग्यांक तीन असतो. या अंकाचा स्वामी गुरु आहे.

Anjali Potdar

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याचा ३, १२, २१, ३० या तारखांना झाला आहे त्यांचा भाग्यांक तीन असतो. या अंकाचा स्वामी गुरु आहे. या व्यक्तींचा विचार केला तर हे लोक नैतिक मूल्य जपणारे, विशुद्ध प्रेम करणारे न्याय याबद्दल विशेष प्रेम ठेवणारे असतात. आयुष्यामध्ये यश मिळते स्वतःच्या कर्तुत्वाबद्दल विश्वास असतो.

स्वतःचे निर्णय स्वतःच घेतात मोठ्याने बोलण्याची सवय असते. कायदे कानून, नियम व्यवस्थित पाळतात. संभाषण कलेमध्ये प्रवीण असतात. स्वयंकेंद्रित वृत्ती नसते इतरांचा विचार करतात. बौद्धिक पातळी उच्च दर्जाची असते. आपले मन खूप मोठे आणि विशाल आहे.

विनोद बुद्धी सहकार्याची भावना प्रामाणिकपणा हे विशेष गुण आपल्या स्वभावात आहेत. स्वभावाने खुल्या मनाचे आणि मत्सर यापासून दूर राहता. तुमच्या चांगलेपणाचा खूप वेळेला इतर लोक गैरफायदा घेतात. महत्त्वाकांक्षि असल्याने पुढारी पण आवडते.

निसर्गप्रेम असते हे विशेष गुण तुमच्याकडे आढळतात. कामभावना उस्फूर्त आणि निरोगी स्वभावाच्या असतात. धार्मिक खोटेपण/ दांभिकता खूप वेळा डोकावते. तुमच्यामधून होणारी स्पंदने ३ या अधिपत्त्याखाली येणारी आहेत.

त्यामुळे मोठे मोठे तत्त्वज्ञानी बऱ्याच वेळा या अंकावर जन्मावर येतो. न्यायाधीश किंवा धर्माबद्दल अधिकारी व्यक्ती या अंकाचे दिसून येतात. लोकांचे कल्याण करण्याची वृत्ती असते शांतता आणि ऐक्य या गोष्टी तुम्हाला प्रिय असतात. काही वेळेला याविरुद्ध गोष्टी घडल्या तर तुम्ही अस्वस्थ होता. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी खूप वेळेला धडपड करावी लागते.

दुसऱ्याने केलेली टीका तुम्ही मनाला खूप लावून घेता. नोकरी व्यवसायाचा विचार केला तर - वेगवेगळ्या प्रकारचे नोकरी व्यवसाय तुम्ही करू शकता. तुमच्यामध्ये महत्त्वाकांक्षा आणि नेतृत्व क्षमता असल्यामुळे मंत्री, राजदूत न्यायाधीश, सचिव, सर्वसामान्यांचे कल्याण करण्यासाठी असणारे सर्वे व्यवसाय तुम्हाला चालतात.

उच्चपदस्थ अधिकारी, शिक्षण क्षेत्र, वैद्यकीय व्यवसाय, सावकारी, जाहिरात, अभिनय क्षेत्र हे तुमच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. रोग आजाराचा विचार केला तर - ३ अंक रक्ताभिसरणावर परिणाम करतो.

रक्ताचे आजार ,छाती, फुफ्फुस, घसा यांचा विकारापासूनही त्रास संभवतो. सांधेदुखी, ताप, निमोनिया, क्षय, घटसर्प होण्याची शक्यता असते. मधुमेहाची शक्यता आहे. त्यामुळे याविषयी सावधगिरी बाळगावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

Local Body Election: पैसे वाटप करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पकडलं; संतप्त नागरिकांनी मतदान केंद्राबाहेरच चोपलं

SCROLL FOR NEXT