Numerology Predictions  
राशिभविष्य

Numerology: सावधान! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तींसाठी घातक आहे एप्रिलचा महिना

Numerology: अंकशास्त्रानुसार, एप्रिल महिना काही लोकांसाठी कठीण असेल. या महिन्यात लोकांनी कोणती खबरदारी घ्यावी, याबद्दल जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • एप्रिल महिना काहींसाठी कठीण

  • जन्मतारखेनुसार परिणाम बदलणार

  • मूलांक काढणे महत्त्वाचे

अंकशास्त्र अर्थात आपली जन्मतारीख आपल्या जीवनाबद्दल आणि भविष्याबद्दल बरेच काही सांगते. आपल्या जन्मतारखांची बेरीज केल्यानंतर आपला मूलांक निघत असतो. जर एखाद्याचा जन्म ३१ तारखेला झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ असेल. तर १ तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मूलांक १ असेल. मुलांक काढण्यासाठी तुम्हाला फक्त जन्मतारखेची बेरीज करायची असते.

महिना आणि वर्षाची बेरीज करायची नाही. मुलांकातून महिना, साप्ताहिक आणि दैनिक भविष्यवाण्याही केल्या जातात. आज आपण अशा लोकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना एप्रिल महिन्यात सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. अंकशास्त्रानुसार, एप्रिल महिना काहींसाठी आव्हानात्मक असू शकतो.

मुलांक १

कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक १ असतो. हा मुलांक असलेल्या लोकांनी एप्रिल महिन्यात कोणतेच प्रकारची घाई करून. या महिन्यात संयम आणि समजूतदारपणा दाखवावा. तुम्हाला क्षुल्लक गोष्टींवरून राग येऊ शकतो. त्यामुळे तणाव वाढण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या संपूर्ण महिन्याचे काळजीपूर्वक नियोजन करा.

मुलांक २

कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० किंवा २९ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक २ असतो. मुलांक २ असलेल्या व्यक्तींना एप्रिल महिन्यात भावनिकदृष्ट्या थोडे कमजोर वाटू शकते त्यामुळे स्वतःला बळकट करा. कोणाचेही बोलणे मनावर घेऊ नका. नकारात्मक विचार आणि लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कुटुंबासोबत वेळ घालवा.

मुलांक ३

कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ किंवा ३० तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक ३ असतो. हा मुलांक असलेल्या व्यक्तींना एप्रिल महिन्यात अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. या महिन्यात संयम बाळगणे आवश्यक असेल. जर एखादे खूप महत्त्वाचे काम करायचे असेल, तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. भगवान विष्णूची उपासना करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

मुलांक ४

ज्यांचा मुलांक ४ आहे, त्यांच्यासाठी एप्रिल महिना फारसा अनुकूल राहणार नाही. या गटात कोणत्याही महिन्याच्या ४, १३ किंवा २२ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा समावेश होतो. एप्रिल महिन्यात या व्यक्ती काहीसा द्विधा मनःस्थितीत सापडण्याची शक्यता आहे. विनाकारण काळजी करणे टाळा. एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT