Grah Gochar saam tv
राशिभविष्य

Grah Gochar: पुढच्या वर्षी 'या' ३ राशींवर बरसणार पैसाच पैसा, लक्ष्मी नारायण योग करणार श्रीमंत

Grah Gochar: ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने नव वर्ष चांगलं असून यावेळी अनेक ग्रह त्यांच्या राशीत बदल करणार आहे. जानेवारी महिन्यात लक्ष्मी नारायण राजयोग नावाचा अतिशय शुभ योग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या राशीत बदल करतात. सध्या वर्षाचा शेवटचा महिना सुरु असून आता नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने नव वर्ष चांगलं असून यावेळी अनेक ग्रह त्यांच्या राशीत बदल करणार आहे. यावेळी जानेवारी महिन्यात काही ग्रहांचं गोचर होणार आहे.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार,28 जानेवारीला शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. 31 मे पर्यंत शुक्र या राशीत राहणार आहे. ग्रहांचा राजकुमार बुध देखील मीन राशीत असणार आहे. दोघे 27 फेब्रुवारी रोजी रात्री 11.46 वाजता एकत्र असल्याने मीन राशीमध्ये दोन्ही ग्रहांचा संयोग होणार आहे. यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग नावाचा अतिशय शुभ योग तयार होणार आहे.

मेष रास

मेष राशीच्या लोकांना लक्ष्मी नारायण योगामुळे फायदा होऊ शकणार आहे. त्यांचा मान-सन्मान वाढू शकणार आहे. करिअरमध्ये तुम्हाला भरघोस यश मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित जमिनीचा फायदा होईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहणार आहे. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठीही लक्ष्मी नारायण योग लाभदायक ठरणार आहे. या काळात नशीब साथ देणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळणार आहे. मिथुन राशीच्या भौतिक सुखात वाढ होऊ शकणार आहे.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग शुभ राहणार आहे. या काळात गुंतवणुकीवर फायदा मिळू शकतो. व्यवसायात भागीदारांचे सहकार्य मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगली वागणूक मिळू शकणार आहे. नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT