navpancham rajyog Saam Tv
राशिभविष्य

Navpancham Yog: शुक्र-शनीने बनवला नवपंचम राजयोग; 'या' राशींना धनलाभासोबत पदोन्नतीचे योग

Navpancham Yog: १०० वर्षांनंतर शुक्र आणि शनी देवामुळे नवपंचम राजयोग तयार झाला आहे. जाणून घेऊया नवपंचम राजयोग कोणत्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात. या राजयोगांचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. नुकताच असा एक राजयोग तयार झाला आहे.

तब्बल १०० वर्षांनंतर शुक्र आणि शनी देवामुळे नवपंचम राजयोग तयार झाला आहे. या राजयोगाचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर याचा अधिक प्रभाव दिसून येणार आहेत. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना करियरमध्ये उत्तम संधी मिळणार आहे. तर काही राशींचे अच्छे दिन येणार आहेत. जाणून घेऊया नवपंचम राजयोग कोणत्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे.

तूळ रास

नवपंचम राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला प्रेमसंबंधांमध्ये यश मिळू शकणार आहे. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ देखील मिळू शकतो. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळू शकणार आहे.

कुंभ रास

नवपंचम राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होणार आहे. तुम्ही धार्मिक आणि शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला एखादी आनंदाची बातमी देऊ शकतात.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग अनुकूल ठरणार आहे. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. गुंतवणूक आणि शेअर्समधून तुम्हाला भरघोस नफा मिळू शकतो. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकणार आहे. करियरमध्ये उत्तम संधी मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT