Nag Panchami 2024 Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Nag Panchami Horoscope: नागपंचमीच्या दिवशी या 5 राशींचे भाग्य चमकणार, भगवान शंकराच्या कृपने सगळी संकटे होणार दूर

Rashi Bhavishya in Marathi: नागपंचमीच्या दिवशी काही राशींसाठी ग्रह आणि नक्षत्रांची शुभ स्थिती अत्यंत लाभदायक ठरणार आहे. जाणून घ्या नागपंचमीच्या दिवशी कोणत्या राशींवर भगवान शिवाची कृपा होईल...

साम टिव्ही ब्युरो

नागपंचमीचा सण 9 ऑगस्ट 2024 शुक्रवारी आहे. ज्योतिषांनी सांगितल्यानुसार, नागपंचमीच्या दिवशी लक्ष्मी नारायण योगाचा शुभ संयोग होत आहे. यासोबतच या दिवशी सिद्ध आणि साध्य योगाचा संगमही तयार होत आहे. नागपंचमीच्या दिवशी घडणारे हे योगायोग या दिवसाचे महत्त्व वाढवत आहेत. नागपंचमीच्या दिवशी काही राशींसाठी ग्रह आणि नक्षत्रांची शुभ स्थिती अत्यंत लाभदायक ठरणार आहे. जाणून घ्या नागपंचमीच्या दिवशी कोणत्या राशींवर भगवान शिवाची कृपा होईल...

सिंह - सिंह राशीच्या लोकांसाठी नागपंचमीचा दिवस शुभ आहे. या दिवशी तुम्हाला ऑफिसमध्ये तुमच्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील आणि तुमची प्रशंसा करतील. हा दिवस तुमच्यासाठी आर्थिक समृद्धी घेऊन येईल.

कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी नागपंचमीचा दिवस खूप चांगला असणार आहे. या दिवशी तुम्हाला नवीन नोकरीसाठी चांगले प्रस्ताव मिळू शकतात. प्रमोशनच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

मीन - मीन राशीच्या लोकांसाठी नागपंचमीच्या दिवशी तयार झालेले योगायोग सकारात्मक परिणाम देतील. नशीब तुमच्या बाजूने असल्याने अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होईल. व्यावसायिकांसाठी हा दिवस खूप चांगला असेल.

वृश्चिक - लक्ष्मी नारायण योग वृश्चिक राशीच्या लोकांना यश मिळवून देईल. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला आर्थिक लाभही मिळेल. करिअरमध्ये नवीन पर्याय मिळतील. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पात तुम्हाला यश मिळू शकते.

कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी नागपंचमी अतिशय शुभ दिवस असणार आहे. कामात यश मिळेल. तुमचे एखादे काम खूप दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते पूर्ण होऊ शकते. आर्थिक आघाडीवर चांगले परिणाम प्राप्त होतील, ज्यामुळे मन प्रसन्न राहील.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात भरधाव कार ८० फूट दरीत कोसळली

IPL 2026: आयपीएलपूर्वीच KKR ला 440 वोल्टचा झटका; मॅचविनर गोलंदाज IPL 2026 मधून OUT, कोणाची होणार एन्ट्री?

Induction Use: गॅस सोडून इंडक्शन वापरताय? तर या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात

Chanakya Niti : 'अशा' लोकांना घरात पाऊलही ठेवू देऊ नका, अन्यथा सुखाचा होईल कचरा

Mumbai : मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT