Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Chandra Surya Yuti: चंद्र-सूर्याची युतीने 'या' राशींच्या अडचणी वाढणार; नातं तुटण्यासोबत आर्थिक नुकसानही होणार

Chandra Surya Yuti 2024: काही लोकांवर चंद्र-सूर्य युतीचा शुभ प्रभाव पडेल तर काही लोकांना या काळात अडचणीचा सामना करावा लागणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींचा यामध्ये समावेश आहे.

Surabhi Jayashree Jagdish

एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा ग्रहांची युती होते. बुध आणि सूर्य या दोन्ही ग्रहांना ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. नऊ ग्रहांचा राजा हा सूर्य मानला जातो. तर चंद्र देव माता, मन आणि राणी यांचा कारक ग्रह आहे. येत्या काळात सूर्य आणि चंद्राची युती होणार आहे.

वैदिक दिनदर्शिकेनुसार, 15 डिसेंबर 2024 रोजी रात्री सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे. जिथे तो जवळपास 30 दिवस उपस्थित राहणार आहे. 29 डिसेंबर 2024 रोजी रात्री 11:21 वाजता चंद्र ग्रह धनु राशीत प्रवेश करणार असून यावेळी दोन्ही ग्रहांची युती होणार आहे. काही लोकांवर चंद्र-सूर्य युतीचा शुभ प्रभाव पडेल तर काही लोकांना या काळात अडचणीचा सामना करावा लागणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींचा यामध्ये समावेश आहे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांवर चंद्र-सूर्य युतीचा अशुभ प्रभाव पडणार आहे. वृषभ राशीच्या लोकांनाही त्यांच्या मुलांचे आरोग्य बिघडल्यामुळे समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. त्याचबरोबर कामगारांचा पगार अडकू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांनाही पैशाअभावी तणाव जाणवू शकतो. वृद्धांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद असू शकतात.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांवर चंद्र-सूर्य संयोगाचा अशुभ प्रभाव पडणार आहे. खर्च वाढल्याने बचत कमी होऊ शकते. भविष्यासाठी केलेल्या योजना पूर्ण होणार नाहीत. तुम्हाला कामासाठी धावपळ करावी लागू शकते. जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षित नफा मिळणार नाही. सासरच्या लोकांशी भांडण होऊ शकते.

कुंभ रास

नातं तुटण्याची शक्यता आहे. जे लोक एकाच कंपनीत दीर्घकाळ काम करत आहेत त्यांच्या बॉसशी मतभेद असू शकतात. तुमचा बिझनेसमद्ये नफ्यात घट दिसून येऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी यावेळी कुठेही पैसे गुंतवणं योग्य ठरणार नाही. कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hruta Durgule Husband: अभिनेत्री हृता दुर्गुळेचा नवरा कोण?

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात गूढ वाढलं, पोलिसांनंतर आता खासदारासह पीएवर गंभीर आरोप; भावाचा खुलासा

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आशा वर्करवर ॲम्बुलन्स चालकाकडून लैंगिक छळ

Nashik Crime : संतापजनक; रुग्णवाहिकेत आशा वर्करसोबत गैरवर्तन, रात्री परतताना चालकाचे कृत्य

"RSS रजिस्टर आहे का?" सुजात आंबेडकरांचा थेट सवाल|VIDEO

SCROLL FOR NEXT