Shani margi Saam TV
राशिभविष्य

Shani Margi: धनत्रयोदशीपूर्वी 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस; शनीची सरळ चाल ठरणार शुभ

Surabhi Kocharekar

हिंदू धर्मामध्ये सणांना फार महत्त्व असतं. यामध्ये दिवाळीचा उत्सव हा प्रत्येकासाठी खास असतो. यामध्ये धनत्रयोदशी फार खास असून यंदाच्या वर्षी २९ ऑक्टोबरला ती साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेरजी यांची पूजा केली जाते. यावर्षी धनत्रयोदशीपूर्वी शनी काही राशीच्या लोकांवर कृपा करणार आहे. अशावेळी धनत्रयोदशीपूर्वीच त्यांना भरपूर संपत्ती मिळू शकते.

धनत्रयोदशीनंतर शनिदेव मार्गी होणार आहेत, ज्याचा सकारात्मक प्रभाव काही राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. सध्या शनी देव वक्री असून 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत ते या स्थितीत राहणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी शनी कुंभ राशीतच सरळ चाल चालणार आहेत. शनीची ही स्थिती काही लोकांसाठी भरपूर पैसा घेऊन येणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना यावेळी लाभ मिळणार आहे.

कन्या रास

शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात आनंद येणार आहे. तुमचा बिझनेसमध्ये नफा वाढण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायातही खूप प्रगती होणार आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ शुभ असणार आहे.

कुंभ रास

शनीच्या मार्ग्रस्थ हालचालीचा कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम दिसणार आहे. नोकरदार लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळणार आहे. शनिदेवाच्या विशेष कृपेमुळे तरुणांना त्यांच्या करिअरमध्ये विशेष लाभ मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला लाभ होणार आहे.

मेष रास

या राशींच्या व्यक्तींवर शनिदेवाची कृपा असणार आहे. तुम्हाला करिअरमध्ये अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. वैयक्तिक जीवनातही शांतता राहणार आहे. जुन्या आजारापासून आराम मिळू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Share Market: रेकॉर्डब्रेक! आठवड्याच्या पहिल्या दिवशीच गुंतवणूकदारांचे बल्ले बल्ले; सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावर

Ameya Khopkar : पाकिस्तानी चित्रपट रिलीज नाहीच, अभिनेता आला तर हात-पाय तोडणार, मनसे नेत्याचा इशारा

Maharashtra Politics : विधानसभेनंतर काँग्रेसला अच्छे दिन, नाना पटोलेंनी मुख्यमंत्री व्हावं; ठाकरेंची भर बैठकीत इच्छा

IPL 2025 Mega Auction: आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये मालामाल होणार हे गोलंदाज; दुलिप ट्रॉफीमध्ये केली चमकदार कामगिरी

Nashik News: खेकडे पकडायला गेले अन् घात झाला, जीवलग मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT