Mahalakshmi Yog saam tv
राशिभविष्य

Mahalakshmi Yog: 9 दिवसांनी 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस; चंद्र-मंगळाच्या युतीने बनणार महालक्ष्मी योग

Mahalakshmi Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार व्यक्तीच्या आयुष्यात बदल घडत असतात. चंद्र आणि मंगळ यांची युती जेव्हा होते, तेव्हा 'चंद्र-मंगळ योग' तयार होतो. या योगाला 'महालक्ष्मी योग' असेही म्हटले जाते

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदिक ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. याचं कारण म्हणजे तो एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशावेळी चंद्राचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होतो. ज्यामुळे शुभ आणि अशुभ राजयोग तयार होतात.

सध्या जून महिना सुरु असून या महिन्याच्या अखेरीस चंद्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे तो मंगळाशी युती करणार आहे. अशा परिस्थितीत चंद्र-मंगळ योग तयार होणार आहे. याला महालक्ष्मी योग म्हटलं जातं. या योगाच्या निर्मितीमुळे लोकांना धन, समृद्धी, कलात्मकता, व्यवसाय-नोकरीमध्ये भरपूर लाभ मिळू शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मिथुन रास

या राशीत सहाव्या भावात मंगळ आणि चंद्राच्या संयोगाने तयार झालेला महालक्ष्मी योग तयार होणार आहे. या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. यावेळी तुमच्या आत्मविश्वासात वाढ होऊ शकते. तुम्ही तुमच्या कामात चांगली कामगिरी करू शकाल. दीर्घकालीन मानसिक ताण थोडा कमी होऊ शकतो.

तूळ रास

या राशीच्या लाभघरात महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात अफाट यश मिळू शकतं. आयुष्यात आनंदाची थाप मिळू शकते. आरोग्य चांगले राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. अनेक धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

मीन रास

या राशीच्या लोकांसाठी मंगळ-चंद्राची युती होत असल्याने सहाव्या भावात महालक्ष्मी राजयोग तयार होतेय. या राशीचे लोक अनेक क्षेत्रात अफाट यश मिळणार आहे. यावेळी तुम्हाला मेहनतीचे फळ मिळू शकणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होणार आहेत. कुटुंबासमवेत चांगला वेळ व्यतीत होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT