Budh Nakshatra Gochar 2024 saam tv
राशिभविष्य

Budh Nakshatra Gochar: दिवाळीत बुध ग्रह करणार नक्षत्र गोचर; शनीच्या नक्षत्रात प्रवेश केल्याने 'या' राशींचं नशीब चमकणार

Budh Nakshatra Gochar 2024: १ नोव्हेंबर रोजी ग्रहांचा राजकुमार बुध विशाखा नक्षत्रातून बाहेर पडून अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. जाणून घेऊया यामुळे कोणत्या राशींना लाभ होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

राशी परिवर्तनासोबत ग्रह त्यांच्या नक्षत्रामध्ये देखील बदल करतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी त्याचं नक्षत्र देखील बदलतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. १ नोव्हेंबर रोजी ग्रहांचा राजकुमार बुध विशाखा नक्षत्रातून बाहेर पडून अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

अनुराधा नक्षत्राचा स्वामी शनिदेव आहे. शनी देवाला न्यायाची देवता म्हटलं जातं. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि आणि बुध हे एकमेकांचे मित्र मानले जातात. यावेळी बुध राशीतील बदलामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकणार आहे. या राशींच्या संपत्तीत वाढ होऊ शकणार आहे. जाणून घेऊया यामुळे कोणत्या राशींना लाभ होणार आहे.

मिथुन रास

बुध ग्रहाचं नक्षत्र गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुमचं कौटुंबिक जीवन सुखकर होईल. तुम्हाला शेअर बाजारात चांगला नफा मिळू शकतो. धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे. कामानिमित्त परदेश प्रवास होऊ शकतो.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचे नक्षत्र बदल शुभ ठरणार आहे. ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवीन आणि चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो.

तूळ रास

बुधाचे नक्षत्र बदल गोचर या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. भागीदारीच्या क्षेत्रात आर्थिक लाभ होऊ शकणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले पैसे परत मिळू शकतात. या काळात नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नोकरदार लोकांनाही लाभ मिळू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Kidney Stone: टोमॅटो खाल्ल्याने किडनीमध्ये स्टोन होतो? डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Gold Price Today: खुशखबर! ऐन गणेशोत्सवात सोन्याच्या दरात मोठी घसरण! 18K, 22K आणि 24K सोन्याचे आजचे दर वाचा

Garuda Purana: मृत्यूनंतर आत्म्याला नवीन शरीर किती दिवसांनी मिळतं? गरुड पुराणात दिलीये माहिती

Bipasha Basu: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या; तुकाराम मुंढेंना टॅग करत केली कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT