Budh Gochar Nai Duniya
राशिभविष्य

Budh Gochar 2025: राहूच्या नक्षत्रात आज होणार बुध ग्रहाचं नक्षत्र गोचर; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी

Transit of Mercury Rashifal Budh Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह आज नक्षत्र परिवर्तन करणार आहेत. बुध ग्रह राहुच्या मालकीच्या 'स्वाती' नक्षत्रात (Swati Nakshatra) प्रवेश करणार आहे. स्वाती नक्षत्राचा स्वामी राहु असून, या बदलामुळे बुध ग्रह अधिक प्रभावी आणि अचानक धनलाभ देणारा बनतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषानुसार, बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हटलं जातं. बुध ग्रह तर्कशक्ती, संवाद, बुद्धिमत्ता आणि व्यापार यांचा कारक मानलं जातात. सध्या बुध ग्रह तूळ राशीत भ्रमण करत आहेत आणि या काळात त्यांची गती आणि गोचर विशेष महत्त्वाचे मानले जातात.

सध्या बुध चित्रा नक्षत्रात आहेत, मात्र पंचांगानुसार ७ ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज दुपारी १२.२१ वाजता बुध स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. स्वाती नक्षत्राचा स्वामी ग्रह राहू आहे. बुधाचं हे नक्षत्र गोचर काही राशींसाठी शुभ परिणाम देणार आहे.

यावेळी तर काही राशींना या काळात काही आव्हानांनाही सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. तर काही राशींना या काळात आर्थिक आणि करिअरच्या क्षेत्रात लाभ होणार आहे. यावेळी कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे ते पाहूयात.

आजपासून या राशींचा सुरु होणार सुवर्ण काळ

कर्क रास

कर्क राशीसाठी बुधाचा राहूच्या नक्षत्रात होणारं गोचर अत्यंत लाभदायक मानला जातंय. या काळात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून अडकलेली कामं या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या क्षेत्रात यश मिळण्याचे संकेत आहेत. बँकिंग, किंवा मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना काही आनंदाची बातमी मिळू शकणार आहे.

तूळ रास

तूळ राशीसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे. प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. स्थावर मालमत्ता खरेदीचे योग बनतायत. आर्थिक स्थिती स्थिर आणि चांगली राहणार आहे. घरामध्ये आनंद आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होणार आहे. करिअरमध्ये केलेल्या मेहनतीची दखल घेतली जाणार आहे.

वृषभ रास

वृषभ राशीसाठी बुधाचा राहूच्या नक्षत्रातील गोचर शुभ संकेत घेऊन येणार आहे. या काळात करिअरमध्ये नवीन कामांची जबाबदारी मिळणार आहे. तुम्ही केलेल्या कामातून तुम्हाला चांगलाच नफा मिळणार आहे. नवीन पद किंवा बढतीची संधी निर्माण होऊ शकते. आरोग्याकडे थोडेसे लक्ष देणं गरजेचं आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zumba Benefits: वजन कमी करण्यासाठी योगा किंवा एक्सरसाइजपेक्षा छान गाण्यावर करा झुंबा, मिळतील 'हे' फायदे

Friday Horoscope: नव्या संधीमुळे दिवस उत्साहात जाईल, ५ राशींच्या व्यक्तींची चांदीच चांदी होणार; वाचा शुक्रवारचे राशीभविष्य

मोठी बातमी! राज्यपालांचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

दर्शनासाठी ‘VIP स्कीम’चा सापळा; त्र्यंबकेश्वरमध्ये दलालांचा धुमाकूळ|VIDEO

IND vs ENG T20 WC Semi Final: पॉवर प्लेमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; संजू सॅमसनची फटकेबाजी, २६ चेंडूत ठोकलं अर्धशतक

SCROLL FOR NEXT