Budh Ast 2024 saam tv
राशिभविष्य

Budh Ast: 5 दिवसांनी बुध ग्रह होणार अस्त; किरकोळ चुकीमुळे 'या' राशींचं होणार मोठं नुकसान, अडचणीही येणार

Budh Ast 2024 Effects: बुध बुद्धि आणि व्यापाराचा दाता मानला जातो. त्यामुळे बुधाच्या स्थितीत झालेला बदल हा प्रत्येक राशीच्या व्यक्तीवर परिणाम करतो.

Surabhi Jayashree Jagdish

ग्रह त्यांच्या राशीत बदल करण्याप्रमाणेच अस्त आणि उदय देखील होतात. वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुध ग्रह हा सर्वात लहान ग्रह मानला जातो. त्यामुळे त्याला ग्रहांचा राजकुमार असं म्हटलं जातं. बुध बुद्धि आणि व्यापाराचा दाता मानला जातो. त्यामुळे बुधाच्या स्थितीत झालेला बदल हा प्रत्येक राशीच्या व्यक्तीवर परिणाम करतो.

येत्या काळात बुध अस्त होणार आहे. ५ दिवसांनी म्हणजेच २९ नोव्हेंबरला वृश्चिक राशीत अस्त होणार आहे. यावेळी तो 13 दिवस ते याच अवस्थेत राहणार आहे. यानंतर 12 डिसेंबर रोजी बुधाचा उदय होणार आहे. बुध ग्रहाच्या अस्तामुळे काही राशींच्या व्यक्तींसाठी संकटाचा काळ असणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशीच्या व्यक्तींना सतर्क राहावं.

सिंह रास

या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाची अस्त स्थिती वाईट असू शकते. यामुळे त्यांना पैशाशी संबंधित बाबींमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबात अनेक मुद्द्यांवरून मतभेदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. व्यवसायात परिस्थिती तुमच्या विरुद्ध असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास होऊ शकतो.

वृषभ रास

या राशीच्या लोकांनी 29 नोव्हेंबरनंतर सावध राहण्याची गरज आहे. या व्यक्तींना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्याची मानसिक स्थिती बिघडू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी तुमचं संबंध बिघडू शकतात.

मेष रास

बुधा ग्रहाच्या अस्तामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो. कुटुंबात भाऊ-बहिणी यांच्यात वाद होऊ शकतात. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. तुमची प्रकृती अचानक बिघडू शकते किंवा एखादा जुनाट आजार उद्भवू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Bite: साप चावल्यावर लगेच काय करावे?

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Manikrao Kokate: राजीनाम्याऐवजी माणिकराव कोकाटेंचं खातेबदल होणार? अजित पवारांची नाराजी

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, ३ राष्ट्रीय महामार्गांवरील उपाययोजना ठरतील रामबाण

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

SCROLL FOR NEXT