Budh Ast 2024 saam tv
राशिभविष्य

Budh Ast 2024: बुध ग्रह सिंह राशीत होणार अस्त; 'या' राशींना मिळणार मान-सन्मान आणि अपार धन

Surabhi Kocharekar

ग्रह राशीमध्ये बदल करण्याप्रमाणे वेळोवेळी उदय आणि अस्तही होतात. ग्रहांचा राजकुमार बुध आदर, व्यवसाय, बुद्धिमत्ता इत्यादींचा कारक मानला जातो. सप्टेंबर महिन्यात बुध ग्रह कन्या राशीत स्थित आहे. दरम्यान येत्या काळात तो त्याच्या राशीमध्ये अस्त होणार आहे. बुध ग्रहाच्या अस्तामुळे काही राशींना खास चांगले परिणाम होणार आहेत.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, राजकुमार बुध २० सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजून २६ मिनिटांनी सिंह राशी अस्त होणार आहेत. यानंतर ३ दिवसांनी तो कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी बुध ग्रहाच्या अस्तामुळे कोणत्या राशींना अधिक लाभ होणार आहे ते पाहूयात.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी बुधाची स्थिती लाभदायक असणार आहे. यावेळी अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. तुमच्या कामाचा विचार करून पदोन्नती मिळू शकते. व्यवसायाच्या क्षेत्रातही भरपूर फायदा होणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांवर बुध ग्रहाच्या स्थितीतील बदलाचा सकारात्मक परिणाम मिळणार आहे. दीर्घकाळ चाललेल्या कौटुंबिक समस्यांपासून आराम मिळू शकतो. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते या काळात करू शकता. नोकरदार लोकांनाही त्यांच्या कामाच्या ठिकाणी चांगला वेळ जाईल. धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे.

वृश्चिक रास

बुध ग्रहाचा अस्त तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर तुम्ही अनेक क्षेत्रात यश मिळवू शकता. तुमचा समाजात मान सन्मान वाढणार आहे. व्यवसायातही लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार असून पैशांची समस्या दूर होणार आहे.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladaki Bahin Yojana: जरांगेंकडे सरकारचं दुर्लक्ष, 'लाडकी बहीण' योजनेचा कार्यक्रम उधळवून लावणार, सकल मराठा समाजाचा इशारा

Nagpur News : नागपूरमध्ये हेराफेरी! इस्रो आणि नासाचं ऑफिस उघडले, १११ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे दिली, ५ कोटी उकळले!

BIS Recruitment: भारतीय मानक ब्युरोमध्ये नोकरीची संधी; मिळणार ७५००० रुपये पगार; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Raj Thackrey :''.. मग आधी पालिका निवडणुका घ्या!'', राज ठाकरेंची पोस्ट

IPL 2025 Auction: IPL 2025 स्पर्धेचं ऑक्शन केव्हा अन् कुठे होणार? मोठी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT