Budh Gochar Saam tv
राशिभविष्य

Budh Margi 2024: वृश्चिक राशीत बुध ग्रह झाला मार्गस्थ; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार पैसाच पैसा

Budh Margi 2024: बुधाच्या थेट हालचालीचा काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडतो, तर काही राशींवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना सावध राहावं लागणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह गोचरप्रमाणे वक्री आणि मार्गी देखील होतात. ग्रहांच्या या स्थितीचा परिणाम देखील सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो. डिसेंबर महिन्यात बुध ग्रह मार्गी झाला आहे. बुध ग्रहाच्या मार्गी चालीने काही राशींच्या व्यक्तींना सावध राहावं लागणार आहे.

16 डिसेंबर रोजी वाणी, बुद्धिमत्ता आणि व्यवसायाचा कारक असलेला बुध ग्रह वृश्चिक राशीत मार्ग्रस्थ होणार आहे. बुधाच्या या हालचालीचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, बुधाच्या थेट हालचालीचा काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडतो, तर काही राशींवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना सावध राहावं लागणार आहे ते पाहूयात.

कन्या रास

बुधाची मार्गी चाल कन्या राशीसाठी अनुकूल नसणार आहे. या काळात वाणीवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. या काळात तुमचं मोठं नुकसान होऊ शकणार आहे. व्यवसायाची आर्थिक गती मंदावू शकते. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे.

धनु रास

या राशीच्या 12व्या घरात बुध ग्रहाचं आगमन झालंय. या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित सर्व कामांमध्ये आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही तणावाचा सामना करावा लागू शकतो. यासोबतच या काळात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. आर्थिक संकटाचीही चिन्हे आहेत.

मीन रास

या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रह मार्गी असणं फारसं चांगलं नाही. कारण या राशीच्या 9व्या घरात बुध ग्रहाने प्रवेश केलाय. बुधाच्या प्रतिगामी काळात सुख-सुविधांमध्ये घट होणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमच्या यशामध्ये अडथळे येणार आहेत. प्रतिष्ठा मिळविण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागणार आहेत. तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT