Budh Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Budh Gochar: 66 दिवसांमध्ये 'या' 3 राशींचं नशीब फळफळणार; बुध ग्रहाच्या गोचरमुळे मिळणार छप्परफाड पैसा

Budh Gochar 2025: ६६ दिवसांनंतर ७ मे २०२५ रोजी पहाटे ४:१३ वाजता, बुध मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाचं हे गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी वरदान ठरणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी नऊ ग्रहांमध्ये बुध ग्रहाचं विशेष स्थान आहे. म्हणूनच त्याला ग्रहांचा राजकुमार म्हटलं जातं. यावेळी बुद्धिमत्ता, व्यवसाय आणि ज्ञान इत्यादींवर देखील नियंत्रण ठेवतो. वैदिक कॅलेंडरच्या गणनेनुसार, बुध २७ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ११:४६ वाजता मीन राशीत प्रवेश केला.

त्यामुळे आतापासून सुमारे ६६ दिवसांसाठी, बुध ग्रह देवगुरू गुरूच्या राशीत म्हणजेच गुरु, मीन राशीत राज्य करणार आहे. ६६ दिवसांनंतर ७ मे २०२५ रोजी पहाटे ४:१३ वाजता, बुध मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाचं हे गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी वरदान ठरणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

वृषभ रास

कालपासून बुध ग्रह वृषभ राशीच्या ११ व्या घरात विराजमान आहे. जे लोक एकाच कंपनीत बराच काळ काम करत आहेत त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता असते. जोडीदारासह आणि कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक सहलीला जाऊ शकतात. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे. व्यावसायिकांना पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळेल.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होणार आहे. ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. जर तरुणाचा त्यांच्या वडिलांशी वाद होत असेल तर मतभेद मिटण्याची शक्यता आहे. धार्मिक यात्रेवर जाण्याचा निर्णय सिंह राशीच्या लोकांच्या हिताचा असणार आहे.

मकर रास

बुध ग्रह मकर राशीच्या तिसऱ्या घरात भ्रमण करणार आहे. त्यामुळे त्यांना लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य सुधारणार आहे. गेल्या वर्षी कोणत्याही कंपनीत गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्यातून नफा मिळू शकतो. नवीन करार पूर्ण झाल्याने व्यावसायिकांचा नफा वाढू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Shock : नव्या घरात जाण्याचे स्वप्न अपूर्ण; बांधकामाच्या ठिकाणी विजेचा धक्का लागून मृत्यू

Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

SCROLL FOR NEXT