Shani Budh Yuti saam tv
राशिभविष्य

Shani-Budh Vakri: जुलै महिन्यात बुध-शनी होणार वक्री; वृषभ, मिथुन, कर्क राशींना घरी पडणार पैशांचा पाऊस

Shani Dev And Budh Vakri 2025: काही ग्रह गोचरप्रमाणे वक्री आणि मार्गस्थ देखील होतात. या दोन्ही ग्रहांच्या वक्री स्थितीचा कोणत्या राशींवर कसा पारिणाम होणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह गोचरप्रमाणे वक्री देखील होतात. येत्या काळात नवग्रहांमधील दोन ग्रह वक्री अवस्थेत जाणार आहेत.

वैदिक कॅलेंडरनुसार, जुलै महिन्यात न्यायाधीश शनिदेव आणि ग्रहांचा राजकुमार बुध हे वक्री होणार आहेत. म्हणजेच ते उलटी चाल चालणार आहेत. याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशी आहेत ज्यांचं नशीब उजळणार आहे. या राशींना करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकणार आहे. या काळात तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात.

वृषभ रास

शनिदेव आणि बुध ग्रहाचे वक्रदृष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. शनिदेव तुमच्या राशीपासून ११ व्या स्थानावर वक्री होणार आहेत. बुध तुमच्या राशीपासून तिसऱ्या स्थानात मागे जाणार आहे. यावेळी तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगलं यश मिळणार आहे. नोकरीत नवीन प्रकल्प उपलब्ध होणार आहे.

मिथुन रास

बुध आणि शनीची वक्री हालचाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती मिळू शकणार आहे. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला नवीन संधी मिळतील.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी शनि आणि बुध ग्रहाची वक्री हालचाल फायदेशीर ठरणार आहे. शनिदेव तुमच्या राशीपासून भाग्य स्थानावर वक्री असणार आहे. तुमची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

SCROLL FOR NEXT