Trigrahi Yog saam tv
राशिभविष्य

Grah Gochar: बुध-शनी-सूर्याच्या युतीने या राशींच्या आर्थिक प्रगतीला लागणार गती, पैशांची चिंता मिटणार!

Trigrahi Yog 2025: तीन ग्रह मीन राशीत एकत्र येणार आहेत. ज्यामुळे सूर्य, बुध आणि शनि यांचा युती होऊन त्रिग्रही योग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कोणताही ग्रह विशिष्ट कालावधीसाठी १२ राशींपैकी एका राशीत राहतो. ग्रह वेळोवेळी राशी बदल करतात. यावेळी एकाच राशीत अनेकदा ३ ग्रहांची युती होते तेव्हा त्रिग्रही योग तयार होतो. त्रिग्रही योगाच्या निर्मितीमुळे काही राशींचं जीवन बदलणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह गुरुवारी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी मीन राशीत भ्रमण करणार आहे. तर सूर्य १४ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ६:५८ वाजता मीन राशीत प्रवेश करेल. यानंतर २९ मार्च २०२५ रोजी शनि मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत हे तीन ग्रह मीन राशीत एकत्र येणार आहेत. ज्यामुळे सूर्य, बुध आणि शनि यांचा युती होऊन त्रिग्रही योग तयार होणार आहे.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग फायदेशीर ठरणार आहे. आयुष्यातील चालू असलेल्या समस्या सोडवता येणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहणार आहे. मालमत्तेशी संबंधित लाभ मिळण्याची शक्यता आहे. कोर्टकचेरीशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे.

कुंभ रास

कुंभ राशीसाठी त्रिग्रही योग खूप चांगला असणार आहे. सूर्य, बुध आणि शनीच्या कृपेने सर्व कामं पूर्ण होतील. तुम्हाला काही न्यायालयीन प्रकरणात यश मिळणार आहे. कर्जापासून मुक्तता मिळण्याची शक्यता आहे. कर्ज दिलेले कोणतेही पैसे वसूल केले जाऊ शकतात. कामाशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला प्रगती मिळू शकणार आहे.

मीन रास

मीन राशीसाठी त्रिग्रही योग फायदेशीर राहणार आहे. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. व्यापाऱ्यांना व्यवसायात नफा होईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. जर तुम्ही बराच काळ एखादं काम पूर्ण करू शकत नसाल किंवा तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर तुम्ही त्यात यशस्वी व्हाल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT