shani margi Saam Tv
राशिभविष्य

Zodiac Sings: बुध-गुरुने बनवला अशुभ योग; 'या' राशींचं होणार मोठं नुकसान

Zodiac Sings: बुध आणि गुरु एकमेकांच्या 180 अंशांवर स्थित राहून प्रतियुती योग तयार करणार आहेत. ज्योतिषशास्त्रात, बुध-गुरूचा प्रतियुती योग बहुतेक राशींसाठी योग्य आणि अनुकूल ठरणार नाहीये.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाच्या हालचालीचा परिणाम हा सर्व राशींवर होत असतो. ग्रहांच्या हालचालीसाठी यंदाचा डिसेंबर महिना खूप खास मानला जातोय. 4 डिसेंबर 2024 पूर्वी बुध त्याच्या स्थितीत बदल करणार आहे तर शुक्र आपली राशी बदलणार आहे. याशिवाय केतू आणि सूर्य एकाच वेळी नक्षत्र बदलून त्यांच्या हालचाली बदलतील.

वैदिक ज्योतिषशास्त्रात 3 ग्रहांना सर्वात शुभ मानलं जातं. यामध्ये बुध, शुक्र आणि गुरु या ग्रहांचा समावेश आहे. बुधवारी म्हणजे ४ डिसेंबर रोजी बुध आणि गुरु एकमेकांच्या 180 अंशांवर स्थित राहून प्रतियुती योग तयार करणार आहेत. ज्योतिषशास्त्रात, बुध-गुरूचा प्रतियुती योग बहुतेक राशींसाठी योग्य आणि अनुकूल ठरणार नाहीये. या योगाचा काही राशींच्या व्यक्तींवर विपरीत परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मिथुन रास

या राशींच्या व्यक्तींना प्रतियुती योगाचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तुमच्या सध्याच्या नोकरीत तुम्हाला अस्थिरता जाणवू शकते. सहकाऱ्यांसोबत तुमचे मतभेद होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती खालावू शकते. नोकरी सोडण्याचा विचार तुमच्या डोक्यात येऊ शकतो. आरोग्याच्या समस्या उद्भवतील.

कन्या रास

बुध-गुरु ग्रहाच्या प्रतियुती योगाच्या नकारात्मक प्रभावामुळे या काळात तुम्ही अधिक चिंतित आणि गोंधळलेले असणार आहात. मानसिक तणाव वाढल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्यात अडचणी येऊ शकतात. वाढता खर्च रोखणं तुमच्यासाठी कठीण होणार आहे. नवीन नोकरी मिळण्यात अडचण येणार आहे.

धनु रास

बुध-गुरु ग्रहाच्या प्रतियुती योगाच्या नकारात्मक प्रभावामुळे या लोकांचा आत्मविश्वास डळमळू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या बैठकीमध्ये अडथळे येऊ शकतात. बुध-गुरूच्या प्रतियुती योगाच्या अशुभतेमुळे नवीन नोकरी शोधण्यात अडचण येणार आहे. अपूर्ण राहिलेली कामं बिघडू शकतात. कुटुंबात तणाव वाढण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात भरधाव कार ८० फूट दरीत कोसळली

IPL 2026: आयपीएलपूर्वीच KKR ला 440 वोल्टचा झटका; मॅचविनर गोलंदाज IPL 2026 मधून OUT, कोणाची होणार एन्ट्री?

Induction Use: गॅस सोडून इंडक्शन वापरताय? तर या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात

Chanakya Niti : 'अशा' लोकांना घरात पाऊलही ठेवू देऊ नका, अन्यथा सुखाचा होईल कचरा

Mumbai : मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT