Mangal Gochar saam tv
राशिभविष्य

Mangal Gochar: जून महिन्यात भूमिपूत्र मंगळ सूर्याच्या राशीत करणार प्रवेश; 'या' राशींसोबत शुभ गोष्टी घडणार, मिळणार संपत्ती-यश

Mangal Gochar 2025: एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी मंगळाच्या बदलाचा प्रत्येक राशीच्या जीवनावर परिणाम होतो. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. नऊ ग्रहांमध्ये ग्रहांचा सेनापती मंगळ हा खूप खास मानला जातो. नऊ ग्रहांपैकी मंगळ ग्रहाची स्थितीही खास मानली जाते. मंगळ हा सैन्य, युद्ध, शौर्य आणि उत्साहाचा कारक मानला जातो. त्यामुळे मंगळाच्या स्थितीतील बदलाचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर दिसून येतो.

मंगळ सध्या कर्क राशीत असून ७ जून २०२५ च्या रात्री ०२:२८ वाजता तो आपली राशी बदलून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. ज्यावेळी ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा सेनापती मंगळ एकत्र असतात तेव्हा त्याचा प्रभाव दिसून येतो. मंगळाचा सूर्याच्या राशीत प्रवेश काही राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणणार आहे. यावेळी कोणत्या राशींना फायदा होणार ते पाहूयात.

तूळ रास

या राशीच्या लोकांसाठी मंगळाचा सिंह राशीत प्रवेश फायदेशीर ठरू शकतो. मंगळ लाभ घरात भ्रमण करतात. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. तुम्हाला पालक, शिक्षक आणि मार्गदर्शक यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकणार आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. जमीन आणि इमारतीशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो.

मिथुन रास

मंगळाने सिंह राशीत प्रवेश केल्याने या राशीच्या लोकांना आत्मविश्वास वाढू शकणार आहे. यामुळे तुम्हाला अनेक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. या काळात तुमच्या जीवनात आनंद येऊ शकतो. तुम्हाला अनेक बाबतीतही फायदे मिळू शकणार आहेत. कोर्टाच्या केसेसमध्ये तुम्हाला यश मिळेल.

मीन रास

या राशीच्या लोकांसाठी मंगळाचा सिंह राशीत प्रवेश देखील फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना भरपूर फायदे मिळू शकणार आहे. आदर आणि सन्मानात जलद वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. बिझनेसमधून खूप फायदा होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT