Kendra Trikon Rajyog saam tv
राशिभविष्य

Kendra Trikon Rajyog: मंगळ ग्रहाने तयार केला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' ३ राशींसाठी श्रीमंतीचा मार्ग होणार खुला

Kendra Trikon Rajyog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मानला जाणारा आणि साहस, ऊर्जा तसेच भूमीचा कारक ग्रह मंगळ जेव्हा विशिष्ट स्थानांमध्ये प्रवेश करतो, तेव्हा तो अत्यंत शुभ योगांची निर्मिती करतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती मानण्यात येतं. युद्ध, शौर्य, पराक्रम, यांचा कारक हा मंगळ ग्रह मानण्यात येतो. हा ग्रह एका राशीत सुमारे ४५ दिवस राहतो. याशिवाय पुन्हा त्या राशीत येण्यासाठी त्याला सुमारे १७ ते १८ महिने लागतात. त्यामुळे त्याच्या गोचरचा सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो.

सध्या मंगलने वृश्चिक राशीत प्रवेश केला असून ती त्याची त्याची स्वराशी आहे. या गोचरामुळे पंचमहापुरुष योगांपैकी एक असलेल्या ‘रूचक राजयोगा’चा निर्माण झालाय. परिणामी ‘केंद्र-त्रिकोण राजयोग’ तयार होणारे. हा योग काही राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतात. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणारे ते पाहूयात.

सिंह राशी (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळाचा केंद्र-त्रिकोण राजयोग शुभ ठरणार आहे. नवीन नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्याचे योग तयार होणार आहेत. नोकरीत असलेल्या व्यक्तींना वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि त्यांच्या कामाचं कौतुक होणार आहे. त्यामुळे मोठी उद्दिष्टे पूर्ण करण्याची संधी मिळेल.

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या जातकांसाठीही मंगळाचा केंद्र-त्रिकोण राजयोग लाभदायक ठरू शकणार आहे. या राशीच्या दशम भावाचा स्वामी मंगल सध्या पंचम भावात विराजमान आहे. त्यामुळे संतानसुखाची शुभ बातमी मिळू शकणार आहे. सरकारी कामांमध्ये यश मिळेल आणि आर्थिक लाभही होईल.

मेष रास (Aries)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचा केंद्र-त्रिकोण राजयोग फायदेशीर ठरू शकणार आहे. सध्या मंगल या राशीच्या अष्टम भावात आहे. शिक्षण क्षेत्रातही विशेषतः रिसर्च, मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा टेक्नोलॉजीशी संबंधित विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. उच्च शिक्षेसाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकणार आहे. आरोग्य चांगलं राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूर पालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी पालिका प्रशासन सज्ज

Pune : शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारावर जीवघेणा हल्ला; धारदार कोयत्याने वार,पुण्यात खळबळ

Nail cancer signs: नखांवर काळी रेघ दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका; कॅन्सरचं लक्षण असल्याचं तज्ज्ञांचं मत

भाजपने शेवटच्या क्षणी काढलं मराठी कार्ड; मित्रपक्षाचा बडा नेताही फोडला

Bajra Bhakri Recipe: भाकरी थापायला जमत नाही? मग लाटण्याने बनवा मऊ आणि टम्म फुगणारी बाजरीची भाकरी, सोपी आहे पद्धत

SCROLL FOR NEXT