February 2025 Grah Gochar saam tv
राशिभविष्य

Grah Gochar: 19 फेब्रुवारी रोजी ग्रहांचं महागोचर; 'या' राशी होणार मालामाल, भाग्याची साथ मिळत उत्पन्नात होणार वाढ

February 19 planetary transit zodiac impact : बुध आणि शुक्र एकमेकांपासून फक्त ३० अंशांच्या अंतरावर असणार आहेत. ज्योतिषशास्त्राच्या भाषेत, या दोन्ही ग्रहांच्या या स्थितीला बुध आणि शुक्र ग्रहाचा द्विदश योग म्हणतात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, फेब्रुवारी महिना हा खूप खास आहे. यामध्ये १९ फेब्रुवारी हा दिवस मोठा आहे. या तारखेला बुध आणि शुक्र शुभ ग्रह असणार आहे. याशिवाय सूर्य देव नक्षत्र बदलणार आहेत. या दिवशी सकाळी ९:२९ वाजता बुध आणि शुक्र एकमेकांपासून फक्त ३० अंशांच्या अंतरावर असणार आहेत. ज्योतिषशास्त्राच्या भाषेत, या दोन्ही ग्रहांच्या या स्थितीला बुध आणि शुक्र ग्रहाचा द्विदश योग म्हणतात.

याशिवाय दुपारी १२:३४ वाजता सूर्य देव धनिष्ठा नक्षत्रातून बाहेर पडणार असून तो शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ज्योतिषांच्या मते, बुध-शुक्र ग्रहाचा द्विदश योग आणि सूर्याच्या नक्षत्रातील बदलामुळे काही राशींना संपत्ती, करिअर आणि नातेसंबंधांमध्ये प्रचंड फायदा होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

वृषभ रास

या बदलामुळे वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात विशेष फायदे मिळू शकणार आहेत. व्यवसायात भागीदारीसाठी देखील हा चांगला काळ असणार आहे. नोकरीत पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर देखील मिळू शकतात.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ यश आणि समृद्धीमध्ये वाढ करणारा ठरू शकतो. ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढणार आहे. नवीन गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल असणार आहे. तुम्हाला शेअर बाजार, रिअल इस्टेट किंवा व्यवसाय विस्तारात पैसे गुंतवायचे असतील तर व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. जुने मतभेद दूर होऊ शकतात.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला ठरू शकणार आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळणार आहे. परदेशाशी संबंधित कामात विशेष लाभ होऊ शकतात. काही जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

SCROLL FOR NEXT