Chandra Grahan 2024 saam tv
राशिभविष्य

Chandra Grahan 2024: चंद्र ग्रहणाला बनणार अद्भुत संयोग; 'या' राशींना अचानक मिळणार बंपर लाभ

Chandra Grahan 2024: १८ सप्टेंबर रोजी सकाळी चंद्रग्रहण होणार असून यावेळी वेळी चंद्र मीन राशीत असणार आहे. यावेळी राहू आणि चंद्राच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

लवकरच यंदाच्या वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण लागणार आहे. १७ सप्टेंबर पासून पितृ पक्षाला सुरुवात होणार आहे. तर २ ऑक्टोबर रोजी पितृ पक्ष समाप्त होणार आहे. दरम्यान याच काळात चंद्र ग्रहण लागणार आहे. १८ सप्टेंबर रोजी सकाळी चंद्रग्रहण होणार असून यावेळी वेळी चंद्र मीन राशीत असणार आहे. शिवाय याठिकाणी राहू ग्रह देखील असणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, राहू आणि चंद्राच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होणार आहे. या ग्रहण योगामुळे काही राशींच्या व्यक्तींवर सकारात्मक परिणाम होणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींवर चांगले परिणाम होणार आहेत.

वृषभ रास

या राशीच्या अकराव्या घरात चंद्र प्रवेश करणार आहे. यामुळे वृषभ राशींच्या व्यक्तींना अधिक लाभ होणार आहे. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला खूप फायदा होणार आहे. मित्रांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचीही शक्यता असून कुटुंबियांकडून तुमचे चांगले संबंध असू शकतात.

वृश्चिक रास

या राशीमध्ये पाचव्या भावात ग्रहण होणार आहे. या राश करिअर आणि व्यवसायात खूप फायदा होणार आहे. परदेशात जाऊन शिक्षण पूर्ण करायचं असल्यास इच्छा पूर्ण होणार आहे. तुम्हाला तुमच्या पालकांचं पूर्ण सहकार्य मिळू शकेल. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल. घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे.

कुंभ रास

या राशीच्या दुसऱ्या घरात ग्रहण योग तयार होणार असून या राशींच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकणार आहे. जीवनात आनंद येणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला इतरांचं सहकार्य मिळणार आहे. घरात एखादं मंगल कार्य होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT