Venus Retrograde Zodiac Luck Wealth saam tv
राशिभविष्य

Shukra Vakri: रविवारपासून 3 राशींचं भाग्य चमकणार; शुक्राच्या वक्री चालीने मिळणार धन-संपत्ती

Venus Retrograde Zodiac Luck Wealth: रविवारी 2 मार्च रोजी शुक्र मीन राशीत वक्री होणार असून त्याचा सर्व राशींवर चांगला आणि वाईट परिणाम होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह वक्री आणि मार्गी चाल देखील चालतात. ग्रहांच्या अशा स्थितीचा देखील प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होत असतो.

सध्या शुक्र ग्रह गुरूच्या राशीत विराजमान आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 2 मार्च रोजी शुक्र मीन राशीत वक्री होणार असून त्याचा सर्व राशींवर चांगला आणि वाईट परिणाम होणार आहे. पंचांगानुसार शुक्र पहाटे 05 वाजून 10 मिनिटांनी मीन राशीत वक्री चाल चालणार आहे. शुक्राच्या वक्री चालीने कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते पाहूयात.

मेष रास

मीन राशीतील शुक्र वक्री मेष राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. पैसे मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे बिघडलेले नातेसंबंध सुधारणार आहेत. गुंतवणुकीचा विचार करू शकता. नोकरदारांना पदोन्नती मिळू शकते.

कुंभ रास

मीन राशीतील शुक्र वक्री कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी फलदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या नशिबाची दारं उघडणार आहेत. त्याचप्रमाणे रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहणार आहे. सामाजिक कार्यात तुमची रुची वाढू शकते. तुमचा मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा मिळवण्यासाठी आपण चांगले निर्णय घेऊ शकणार आहात.

मीन रास

शुक्र मीन राशीत वक्री होणार आहे. या काळात नशीब तुमच्या सोबत असणार आहे. संपत्तीत अचानक वाढ होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. रखडलेले पैसे परत मिळणार आहेत. अडकलेली कामं पूर्ण होतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकरेंची माहिती

MNS worker Detained : मनसैनिकांना दादरमध्ये घेतलं ताब्यात, मुंबईतील वातावरण तापलं, हजारो कार्यकर्ते जल्लोष करत रवाना

ओवेसींचा रामाला नमस्कार; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Businessman: गाडीतून उतरताच धाडधाड फायरिंग, प्रसिद्ध व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; मुलालाही असंच संपवलं होतं

SCROLL FOR NEXT