Ganesh Avatar in Kalyug saam tv
राशिभविष्य

Ganesh Chaturthi 2024: कलियुगातही प्रकट होणार भगवान गणेश, पाहा कसा असणार गणपतीचा हा अवतार?

Ganesh Chaturthi 2024, Ganesh Avatar in Kalyug: येत्या ७ तारखेला गणेश चतुर्थी असून कलियुगात देखील गणपती अवतार घेणार असल्याचं पुराणात नमूद करण्यात आलंय.

Surabhi Jayashree Jagdish

महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो. येत्या शनिवारपासून गणपती बाप्पा अनेकांच्या घरी विराजमान होणार आहेत. शंकर आणि पार्वती यांचा पुत्र गणेश याल बुद्धीची देवता मानलं जातं. कोणत्याही शुभ कार्यामध्ये पहिल्यांदा गणेशाचं पुजन केलं जातं. गणपतीच्या जन्माबाबत अनेक भिन्न कथा आहेत.

हिंदू धर्मामध्ये भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी ही गणेशाची जन्मतारीख मानली जाते. त्यामुळे यंदाच्या वर्षी 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थी म्हणून साजरी करण्यात येतेय.

पुराणाचा इतिहास पाहिला तर प्रत्येक युगात भगवान गणेशाच्या जन्माचं वर्णन पाहायला मिळतं. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापार युगात या सर्व युगांमध्ये गणेशाच्या जन्माचं वर्णन आहे. अशातच कलियुगात गणेशाचाही अवतार होणार आहे, असं भाकीत पुराणात करण्यात आलंय.

विविध युगात गणेशाचा अवतार

सतयुग

मान्यतानुसार, सतयुगात गणेशाचा जन्म विनायकाच्या रूपात झाला होता. गणपतीच्या अवतारात त्यांचं वाहन सिंह होतं. यावेळी देवांतक आणि नरांतक नावाच्या राक्षसांचा वध करून धर्माची स्थापना केल्याचं म्हटलं जातं.

त्रेतायुग

या युगामध्ये भगवान गणेशाचा जन्म उमाच्या गर्भातून झाला होता. ज्यावेळी त्याचं नामकरण गणेश करण्यात आलं. या अवतारात त्याचं वाहन मोर असून त्याचा रंग पांढरा होता. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जन्म घेऊन त्यांनी सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केला.

द्वापर युग

द्वापर युगात गणेशाचा अवतार गजाननच्या नावाने प्रसिद्ध होता. या युगामध्ये माता पार्वतीने गणेशाला जन्म दिला होता. मात्र जन्मानंतर काही कारणास्तव माता पार्वतीने त्याला जंगलात सोडलं आणि त्याचे पालनपोषण पराशर मुनींनी केलं. या अवतारात वेदव्यास ऋषींच्या सांगण्यावरून गणेशजींनी महाभारत लिहिलं होतं. त्याचप्रमाणे त्याने सिंदुरासूरचा वध केल्याचं पुराणात म्हटलं आहे.

कलियुग

तर आता कलियुगात देखील गणपतीच्या अवताराची भविष्यवाणी करण्यात आली आहे. कलियुगात भगवान विष्णूच्या कल्की अवताराची चर्चा ज्या प्रकारे केलीये त्याचप्रमाणे गणेशाच्या धुम्रकेतू अवताराचा या ठिकाणी उल्लेख सापडतो. कलियुगात गणपती बाप्पा कधी आणि कोणत्या अवतारात येणार हे जाणून घेऊया.

कलियुगात कसा असणार भगवान गणेशाचा अवतार?

गणेश पुराणात कलियुगाच्या शेवटी, भगवान गणेशाचा अवतार धरतीवर येणार असून ज्याचं नाव धुम्रकेतू किंवा शुपकर्ण असणार आहे, असं भाकीत स्वतः गणेशाने केलंय. कलियुगात पसरलेलं दुष्कृत्य, अन्याय, दुष्कृत्ये दूर करण्यासाठी गणेश या अवतारात येणार आहे. असं मानलं जातं की, देवाच्या हातात तलवार असेल. तो चतुर्भुज होऊन निळ्या घोड्यावर स्वार होऊन पापींचा नाश करून पुन्हा सत्ययुगात प्रवेश करेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT