Ketu Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Ketu Gochar 2025: केतू ग्रह १८ वर्षांनंतर सिंह राशीत करणार प्रवेश; ‘या’ ३ राशींना येणार 'अच्छे दिन',नोकरी अन् व्यवसायात होईल प्रगती

Ketu Gochar 2025: केतू ग्रह सध्या कन्या राशीत भ्रमण करत आहे. या वर्षी मे महिन्यात तो सिंह राशीत प्रवेश करेल.

Bharat Jadhav

ज्योतिषशास्त्रात केतूला छाया ग्रह मानले जातं, म्हणजेच, असा ग्रह जो प्रत्यक्षात अस्तित्वात नाही पण त्याचा परिणाम सर्वांना जाणवत असतो. इतर ग्रहांप्रमाणे केतूदेखील एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवास करत असतो. ग्रहाचे हे संक्रमण १८ महिन्यांनी होत असते. केतू ग्रह सध्या कन्या राशीत भ्रमण करत आहे. यावर्षी मे महिन्यात केतु ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरामुळे अनेक राशींना भाग्य लाभण्याची शक्यता आहे.

केतू संक्रमणाचा फायदा कोणत्या राशींना होईल?

धनू राशी

ज्योतिषांच्या मते या राशीच्या लोकांसाठी केतू संक्रमण खूप लाभकारी ठरणार आहे. मे महिन्यानंतर या राशीच्या जातकांचं भाग्य पलटू शकते. तर नोकरी करणाऱ्यांसाठी सुवर्णकाळ सुरू होणार आहे. काहींना पदोन्नतीसह चांगली पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. या राशींतील अनेकांचे आरोग्य चांगले राहील. घरात एखादं शुभ किंवा शुभ प्रसंग येऊ शक्यता आहे. जर ज्या लोकांची परदेशात सहलीला जाण्याचा विचार आहे, त्यांना परदेशात जाण्याच योग येणार आहे.

वृश्चिक

या राशीच्या लोकांसाठी केतू ग्रहाचे राशी परिवर्तन अनुकूल ठरणार आहे. या राशीतील जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी मे नंतर नोकरी बदलण्याचा सर्वोत्तम काळ असणार आहे. अनेकांना चांगल्या पॅकेजसह नवीन नोकरीचे ऑफर लेटर मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगार लोकांना चांगली नोकरी मिळू शकते. उत्पन्नाचे स्रोत वाढतील.

मिथुन

मिथुन राशीच्या जातकांच्या कुंडलीत केतू ग्रह तिसर्‍या घरात भ्रमण करेल आहे. त्याच्या प्रभावामुळे तुमचे तुमच्या भावंडांसह नाते दृढ होण्याची शक्यता आहे. या भ्रमणामुळे तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून पैसे मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे अनेक नवीन स्रोत बनू शकतात. तुमचा कुटुंबासह सुट्टीवर जाण्याचा प्लान यावेळी यशस्वी ठरू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanteras Wishes : आली दिवाळी! मराठी, हिंदी आणि इंग्रजीत धनतेरसचे प्रियजनांना पाठवा खास मेसेज

Dhanteras 2026 : धनतेरसला पैसे उधार दिले तर घरात येते गरिबी? काय सांगते धार्मिक मान्यता?

ZP अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; घरात सापडलं अडीच किलो सोनं, 11 किलो चांदी

दिवाळीची मिठाई खाताना सावधगिरी बाळगा! मिठाईला चांदीचा वर्ख की अल्युमिनियम फॉईल?

विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार; NDA मधील मित्रपक्षाचा भाजपाला इशारा

SCROLL FOR NEXT