Shani Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Shani Ast: न्यायदेवता शनी पुढच्या महिन्यात होणार अस्त; 'या' राशींच्या व्यक्ती जगणार राजासारखं आयुष्य

Shani Ast 2025: शनि हा वैदिक ज्योतिषशास्त्रातील सर्वात महत्वाचा ग्रह असून त्याच्या स्थितीत थोडासा बदल झाल्याने अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठा बदल होतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर गोचर करतो. त्याचप्रमाणे काही ग्रह उदय आणि अस्त होत त्यांच्या स्थितीमध्ये बदल करतात. शनि हा वैदिक ज्योतिषशास्त्रातील सर्वात महत्वाचा ग्रह असून त्याच्या स्थितीत थोडासा बदल झाल्याने अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठा बदल होतो. शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो.

शनी एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. येत्या काळात शनी लवकरच कुंभ राशीत अस्त होणार आहे. वैदिक शास्त्रानुसार, 28 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:01 वाजता शनी मावळेल आणि 6 एप्रिलपर्यंत या स्थितीत राहील. दरम्यान, शनिही मीन राशीत प्रवेश करेल. अनेक राशीच्या लोकांना शनीच्या अस्तामुळे फायदा होईल. त्यामुळे अनेक राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. तर काही राशींना याचा फायदाही होणार आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

वृषभ रास

या राशीच्या लोकांसाठी शनीची स्थिती लाभदायक ठरू शकणार आहे. करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा पगार वाढू शकतो. व्यवसायातही चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला एखादा नवीन प्रकल्प किंवा एखादी मोठी डील मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबामधून एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळणार आहे.

कर्क रास

या राशीमध्ये शनी आठव्या आणि सातव्या भावात राहणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात झपाट्याने वाढ होणार आहे. व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्ही केलेली रणनीती यशस्वी होऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. तुम्ही पैशांची बचत करण्यातही यशस्वी होऊ शकता.

मीन रास

या राशीच्या लोकांसाठी शनीची ग्रहस्थिती लाभदायक ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये तुम्हाला बरेच फायदे मिळणार आहेत. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. पैशाशी संबंधित समस्या संपणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT