Jupiter Transit 2024 Saam Tv
राशिभविष्य

Jupiter Transit 2024 : 20 ऑगस्टला गुरु संक्रमणामुळे 3 राशींचे भाग्य चमकणार, पुढील तीन महिने होणार धनवृष्टी

Rashi Bhavishya in Marathi : गुरु 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 05:22 वाजता रोहिणी नक्षत्रातून बाहेर पडून मृगाशिरा नक्षत्रात प्रवेश करेल आणि 28 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 01:10 पर्यंत या नक्षत्रात असेल.

साम टिव्ही ब्युरो

वैदिक ज्योतिषशास्त्रात, गुरु हा धन, सुख, सौभाग्य, अध्यात्मचा ग्रह मानला जातो. असे मानले जाते की, कुंडलीत गुरुचे स्थान शुभ असेल तर व्यक्तीला समाजात खूप मान-सन्मान मिळतो. करिअरमध्ये मोठे यश मिळते आणि वैवाहिक जीवन आनंदी राहतं. द्रिक पंचांग नुसार, 1 मे पासून गुरु ग्रह वृषभ राशीत बसला आहे आणि पुढील वर्षीच आपली राशी बदलेल. मात्र नक्षत्र बदलत राहील.

गुरु 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 05:22 वाजता रोहिणी नक्षत्रातून बाहेर पडून मृगाशिरा नक्षत्रात प्रवेश करेल आणि 28 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 01:10 पर्यंत या नक्षत्रात असेल. गुरु मृगाशिरा नक्षत्रात सुमारे 3 महिन्यांपासून स्थित असल्यामुळे, काही राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक महत्त्वपूर्ण बदल होतील आणि खूप शुभ परिणाम मिळतील.

मेष

गुरूचे संक्रमण मेष राशीसाठी लाभदायक ठरेल. या काळात जीवनात अनेक मोठे बदल होतील. प्रदीर्घ काळ चाललेले प्रश्न सुटतील. वैवाहिक जीवनात आनंद राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नोकरी आणि व्यवसायात उत्तम यश मिळेल. या काळात तुमची सर्व कामे यशस्वी होतील.

वृषभ

गुरूचे संक्रमण जीवनात आनंद आणेल. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून भरपूर आर्थिक लाभ होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायाची स्थिती मजबूत होईल. नोकरी आणि व्यवसायात खूप प्रगती कराल. आयुष्यात जे हवे ते मिळेल. करिअरमध्ये तुम्हाला तुमच्या कामाचे अपेक्षित परिणाम मिळतील.

कन्या

गुरूचे संक्रमण करिअरमध्ये शुभ परिणाम देईल. समाजात तुम्हाला खूप मान-सन्मान मिळेल. करिअरमध्ये नवीन यश मिळवाल. या काळात तुम्ही यशाच्या पायऱ्या चढाल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. व्यवसायात प्रचंड आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT