Guru Margi 2025 saam tv
राशिभविष्य

Guru Margi: बृहस्पतिमुळे 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; गुरुच्या सरळ चालीने मिळणार पैसाच पैसा

Guru Margi 2025: 2025 मध्ये, मे महिन्यात गुरु ग्रह त्याच्या राशीत बदल करणार आहे. बुधवार, 14 मे 2025 रोजी रात्री 11:20 वाजता गुरू मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये गोचर करतात. यावेळी काही ग्रह मार्गस्थ आणि वक्री स्थितीत देखील जातात. यामध्ये नऊ ग्रहांपैकी गुरु बृहस्पति असा एक ग्रह आहे जो एका राशीत सुमारे 13 महिने राहतो. 2025 मध्ये, मे महिन्यात गुरु ग्रह त्याच्या राशीत बदल करणार आहे. बुधवार, 14 मे 2025 रोजी रात्री 11:20 वाजता गुरू मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. सध्या गुरू वृषभ राशीमध्ये असून 4 फेब्रुवारी 2025 रोजी मार्गी होणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी 4 फेब्रुवारी रोजी गुरु ग्रह मार्गी होणार असून वृषभ राशीमध्ये जाणार आहे. अशा परिस्थितीत 12 राशीच्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यापैकी 3 राशी भाग्यवान असणार आहेत. या राशींवर गुरूचा विशेष आशीर्वाद असू शकणार आहे. यामध्ये कोणत्या ३ राशींचा समावेश असणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील. गुरुमार्गी नशिबाची बंद दारे उघडतील. मान-सन्मान वाढेल. प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. सामाजिक कार्यातून नवी ओळख निर्माण होणार आहे. संपत्ती वाढल्याने आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तुम्ही लवकरच एखाद्या चांगल्या ठिकाणी जाल जे तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे.

तूळ रास

गुरू मार्गीचा प्रभाव तूळ राशीसाठी शुभ राहणार आहे. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. नात्यात गोडवा वाढण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांच्या दृष्टीने वेळ चांगला जाणार आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकणार आहे. या काळात नोकरदारांना प्रमोशन मिळू शकतं.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी गुरूची मार्गी चाल फायदेशीर ठरणार आहे. गुरु मार्गी पासून तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळणार आहे. तुम्हाला जे काम करायचं आहे ते लवकरच पूर्ण होणार आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधारू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, १ तोळा खरेदीसाठी किती मोजावे लागणार? वाचा २४,-२२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

Why Black Clothes are Avoided During Puja: पूजेच्या वेळी काळे कपडे घालणे का टाळावे?

Latur : दुष्काळासारख्या गंभीर विषयावर बैठक, अधिकारी मात्र मोबाईलमध्ये व्यस्त; संतापजनक VIDEO समोर

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, 1 ऑक्टोबरपासून पगारात होणार मोठी वाढ

SCROLL FOR NEXT