Which Zodiac Signs Will Benefit From Saturn Jupiter Transit saam tv
राशिभविष्य

Trikadasha Yog: 3 नोव्हेंबरपासून चमकणार 'या' राशींचं नशीब; गुरू आणि शुक्र बनवणार त्रिएकादश योग

November 2025 Rashiifal: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यामध्ये ग्रहांच्या स्थितीतील बदलामुळे अनेक महत्त्वाचे योग तयार होतात. येणारा नोव्हेंबर महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत शुभ ठरणार आहे

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी वेळोवेळी गोचर करून शुभ योग आणि राजयोग निर्माण करतात. जे सर्वांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करतात. अशातच सोमवारी ३ नोव्हेंबर २०२५ रोजी शुक्र आणि गुरु हे दोन सर्वात शुभ ग्रह एकमेकांपासून ९० अंशांच्या कोनात असणार आहे.

या योगाला समकोण योग किंवा केंद्र दृष्टि योग असे म्हणतात. या विशेष संयोगामुळे काही राशींच्या नशिबात तेजस्वी बदल होऊ शकतो. करिअर, व्यवसाय आणि आर्थिक प्रगती याचे संकेत मिळत आहेत. चला पाहूया कोणत्या राशींना या योगाचा विशेष लाभ मिळू शकतो.

धनु राशी

धनु राशीच्या व्यक्तींसाठी केंद्र दृष्टि योग अत्यंत लाभदायक ठरू शकणार आहे. या काळात आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत असलेल्या व्यक्तींना अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ रखडलेल्या योजना पुन्हा गती घेणार आहेत. शत्रूंवर विजय मिळेल आणि आत्मविश्वासात वाढ होणार आहे.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र-गुरुचा समकोण योग सकारात्मक परिणाम देणारा ठरणार आहे. या काळात मान-सन्मान प्राप्त होणार आहे. नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडू शकणार आहेत. कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्या बाजूने राहणार आहे. पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.

तूळ राशी

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी केंद्र दृष्टि योग शुभ काळ घेऊन येणार आहे. उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होणार आहे. निवेशातून फायदा होण्याची शक्यता आहे. दूरचा प्रवास होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट

Manoj Jarnage: बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मनोज जरांगेंचा पाठिंबा, सरकारला दिला इशारा| VIDEO

Gold Price: 'या' १० कारणांमुळे सोनं होतेय स्वस्त; दिवाळीनंतर तब्बल ₹१०,३७० नी घसरण, आता गोल्ड खरेदी करणं योग्य?

Winter Lip Care: कोरड्या हवेमुळे ओठ काळे पडतायेत? जाणून घ्या 'हे' घरगुती उपाय

Local Body Election : राज्यातील निवडणुकीसाठी आयोगाचा नवा प्लान, तब्बल २०० कोटींचा खर्च वाढला, आचारसंहिता कधी लागणार?

SCROLL FOR NEXT