Janmashtami  google
राशिभविष्य

Janmashtami 2024: आज जन्माष्टमीच्या दिवशी बदलणार 'या' राशींचं आयुष्य; घरात पैसा येण्याची शक्यता

Janmashtami 2024: श्रावण कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा जन्माष्टमी अतिशय खास असणार आहे. आजच्या दिवशी काही राशीसाठी खास असणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदू धर्मात प्रत्येक सणाला एक वेगळं महत्त्व असतं. आज संपूर्ण राज्यात दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. श्रावण कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा जन्माष्टमी अतिशय खास असणार आहे. यावर्षी 26 ऑगस्ट 2024 ला श्रीकृष्ण जन्म साजरा केला जाणार आहे.

हिंदू धर्मात जन्माष्टमी या सणाला खूप महत्त्व असून ती कृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, कृष्णाष्टमी या नावाने देखील म्हणून ओळखली जाते. हा दिवस प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. मुरलीधर हा भगवान विष्णूचा आठवा अवतार असून त्यांची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, असं मानलं जातं.

हिंदू पंचांगानुसार, आजच्या दिवशी काही राशीसाठी खास असणार आहे. या दिवशी लोक उपवास करतात आणि विविध पूजा विधी करतात. मात्र आजचा दिवस कोणत्या राशींसाठी उपयुक्त आहे, ते पाहूयात

मेष

जन्माष्टमीचा दिवस मेष राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ मानला गेलाय.या दिवशी या लोकांच्या आर्थिक अडचणी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. येत्या काळात तुम्हाला चांगला नफा मिळेल. नोकरीत प्रमोशन आणि जोडीदाराचे सहकार्यही मिळू शकतं.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी जन्माष्टमीचा दिवस खूप आनंदाचा जाणार आहे. या लोकांच्या पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होऊ शकतात.यावेळी तुमचा आत्मविश्वास देखील वाढू शकतो. मालमत्तेतील गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाला मुरली अवश्य अर्पण करा.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी जन्माष्टमीचा दिवस खूप फायदेशीर ठरणार आहे. या राशींच्या व्यक्तींना व्यवसायात यश मिळू शकणार आहे. नोकरदार लोकांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. घरातील वाईट आणि नकारात्मक गोष्टी दूर होतील.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT